महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आलियाच्या घरी लवकरच 'वरात' घेऊन जाणार रणबीर कपूर!! - आलियाच्या घरी वरात घेऊन जाणार रणबीर कपूर

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे जोडपे गेल्या पाच वर्षांपासून हे जोडपे 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात एकत्र काम करत होते आणि कामाच्या दरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यांच्या लग्नाची चर्चा बऱ्याच वेळा होत असते. अखेर रणबीरने आलियासोबत लग्न करणार असल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब केले आहे.

आलियाच्या घरी रणबीरची वरात
आलियाच्या घरी रणबीरची वरात

By

Published : Mar 30, 2022, 5:50 PM IST

मुंबई - बॉलीवूडमध्ये चित्रपटांपेक्षा सेलिब्रिटींचे अफेअर, लव्हस्टोरी, लग्न आणि घटस्फोटाची बरीच चर्चा अधिक होत असते. सध्या बॉलिवूडमध्ये जर कोणत्याही जोडप्याच्या अफेअर आणि लग्नाची सर्वाधिक चर्चा होत असेल तर ती म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची. गेल्या पाच वर्षांपासून हे जोडपे 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात एकत्र काम करत होते आणि कामाच्या दरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली.

आता हे प्रकरण या जोडप्याच्या लग्नावर अडकले आहे. हे दोघे आता लग्न करणार, नंतर ते लग्न करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र आता रणबीर कपूरनेच सांगितले आहे की, तो आलिया भट्टला कधी वधूच्या रुपात आपल्या घरी आणणार आहे.

आलियाच्या घरी रणबीरची वरात

एका मुलाखतीत जेव्हा रणबीर कपूरला आलिया भट्टसोबतच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने स्पष्टपणे सांगितले की तो लवकरच आलियाशी लग्न करणार आहे. पण या लग्नाच्या तारखेबद्दल रणबीरने काहीही सांगितले नाही, पण रणबीरनेही या प्रकरणावर हे लग्न होणार असल्याची आपली मोहर उमटवली आहे.

लग्नाची तारीख सांगणार नाही पण लवकरच आलियाच्या घरी लवकरच वरात घेऊन जाणार असल्याचे सांगितले. यापूर्वी रणबीर कपूरने लॉकडाऊन दरम्यान एका मुलाखतीत म्हटले होते की, जर कोविड -19 चा अडथळा निर्माण झाला नसता तर त्याने आतापर्यंत लग्न केले असते.

आलियाच्या घरी रणबीरची वरात

आलिया आणि रणबीर आधी गुपचूप भेटत होते. पण प्रेम लपून राहत नाही, ही म्हण त्यांच्यावरही चपखल बसली आहे. त्यामुळे आता दोघांनीही आपण एकत्र असून दोघांनीही लग्नासाठी एकमेकांची निवड केल्याचे सार्वजनिकरित्या सांगितले आहे. सध्या रणबीरच्या मुंबईतील बंगल्याचे नूतनीकरण सुरू असून हे काम पूर्णत्वाकडे जाताच हे जोडपे लग्नाच्या तयारीला लागणार आहे. रणबीर आणि आलियाचे कुटुंबीयही या जोडप्यावर खूश आहेत.

रणबीर आणि आलिया पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र काम करत होते आणि दोघे प्रेमात पडले होते. आता ही जोडी लग्नाआधी चित्रपटाच्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. पाच वर्षात तयार झालेला या जोडीचा पहिला चित्रपट 'ब्रह्मास्त्र' यावर्षी 9 सप्टेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

हेही वाचा -आग्र्यातील कैद्यांना दिलेले वचन अभिषेक बच्चनने केले पूर्ण

ABOUT THE AUTHOR

...view details