मुंबई - 'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट राहिला नसून हिंदी चित्रपटसृष्टीत इतिहास बनला आहे. हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला आणि अजूनही चित्रपटगृहांमध्ये सुरू आहे. या चित्रपटामुळे बॉलिवूड आणि देशाच्या राजकारणात मोठा भूकंप झाल्याचे पाहायला मिलाले. आता परदेशातही या चित्रपटाचा बोलबाला होऊ लागला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी पल्लवी जोशी यांना ब्रिटिश संसदेकडून निमंत्रण मिळाले आहे. विवेक ब्रिटिश संसदेत या चित्रपटाबद्दल सांगणार आहेत.
एका मुलाखतीत विवेक अग्निहोत्रीने खुलासा केला आहे की, त्यांना ब्रिटीश संसदेने बोलावले आहे आणि त्यांना संसदेत काश्मिरी पंडितांच्या दुर्दशेबद्दल सांगायचे आहे. विवेक म्हणाला, ''आम्ही एप्रिलमध्ये ब्रिटनमध्ये जाऊन काश्मिरी पंडितांबद्दल चर्चा करणार आहोत, काश्मीर पंडितांवरील अत्याचार आणि नरसंहार जगाच्या कानाकोपऱ्यात नेण्याच्या उद्देशाने 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट बनवण्यात आला आहे. मला आनंद आहे की आम्ही आमच्या उद्दिष्टात यशस्वी झालो आहोत.''