गुवाहाटी -शहरातील टाउन हॉलमध्ये परफॉर्म करत असताना सुप्रसिद्ध गायक जुबीन गर्ग हे अचानक स्टेजवरच कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे.
जुबीन यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना सामान्य वार्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. मीडिया रिपोर्टनुसार, अती तणाव आणि कमी झोपेमुळे जुबीन यांना परफॉर्मन्स दरम्यानच भोवळ आली होती.
हेही वाचा -ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी 'सूर्यवंशी'चं मोशन पोस्टर रिलीज, पाहा खिलाडीचा दमदार लुक