महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'जिंदगानी' : लॉकडाऊन नंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट - ‘जिंदगानी’ लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार

आता कोरोनाच्या जागतिक आपत्तीवर मात करत अखेरीस अनलॉकची प्रक्रिया सुरु झालेली आहे. लॉकडाऊनमध्ये कंटाळलेल्या उदास मनांना उभारी आणण्यासाठी आता बंद पडलेलं करमणुकीच क्षेत्र नव्याने कामाला लागले आहे. आता लवकरच चित्रपटगृहांचे दरवाजे प्रेक्षकांसाठी उघडणार असून अनेक चित्रपट प्रदर्शनासाठी लाईनीत उभे आहेत. विनायक भिकाजीराव साळवे दिग्दर्शित 'जिंदगानी' लॉकडाऊन नंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट असेल.

'जिंदगानी'
'जिंदगानी'

By

Published : Aug 21, 2021, 4:43 PM IST

गेल्यावर्षीपासून कोरोना महामारीमुळे मनोरंजनक्षेत्रात मरगळ आली होती. शूटिंग्स बंद, चित्रपटगृहे बंद, मनोरंजनक्षेत्र बंद. या सर्वामुळे सर्वत्र नकारात्मकता पसरली होती. परंतु आता कोरोनाच्या जागतिक आपत्तीवर मात करत अखेरीस अनलॉकची प्रक्रिया सुरु झालेली आहे. लॉकडाऊनमध्ये कंटाळलेल्या उदास मनांना उभारी आणण्यासाठी आता बंद पडलेलं करमणुकीच क्षेत्र नव्याने कामाला लागले आहे. आता लवकरच चित्रपटगृहांचे दरवाजे प्रेक्षकांसाठी उघडणार असून अनेक चित्रपट प्रदर्शनासाठी लाईनीत उभे आहेत. मराठीत नर्मदा सिनेव्हीजन्स निर्मित आणि विनायक भिकाजीराव साळवे दिग्दर्शित 'जिंदगानी' लॉकडाऊन नंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट असेल.

नर्मदा सिनेव्हीजन्स निर्मित आणि विनायक भिकाजीराव साळवे दिग्दर्शित 'जिंदगानी' हा बदलत्या काळानुसार माणसाच्या बदलत्या जीवनशैलीची जीवनगाथा सांगणारा चित्रपट असून या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लॉंच करण्यात आले. अभिनेता शशांक शेंडे व विनायक साळवे खेडेगावातील कठीण परिश्रम आणि संयमाचे उत्तम उदाहरण ठरणाऱ्या 'प्रभाकर' आणि 'सदा' या आदिवासी व्यक्तींच्या भूमिका साकारत असून या चित्रपटात त्यांच्यासमवेत अभिनेत्री सविता हांडे, सुष्मा सिनलकर, स्मिता प्रभू, सायली पाटील, अभिनेते विनायक साळवे, प्रदिप नवले, गणेश सोनवणे, प्रथमेश जाधव, रवि साळवे, सागर कोरडे, संजय बोरकर, दिपक तावरे, पांडुरंग भारती आढळून येणार आहेत. जिंदगानी चित्रपटाद्वारे वैष्णवी हिचे चित्रपटसृष्टीत पदार्पण होत आहे.

चित्रपटाचे लेखन विनायक भिकाजीराव साळवे यांनी केलेले असून विजय गवंडे यांनी चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केलेली आहेत. तर चित्रपटातील गाणी अजय गोगावले, आदर्श शिंदे, बेला शेंडे, राधिका अत्रे, अमिता घुगरी यांच्या सुरमधुर स्वरांनी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.

‘जिंदगानी’ लवकरच जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - तापसी पन्नू व गुलशन देवय्या नैनितालमध्ये करताहेत 'ब्लर'चे शुटिंग

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details