मुंबई - अभिनेता आमीर खानला मशीनची पुस्तकी व्याख्या विचारणारा प्राध्यापक आणि त्याचं ते... “कहना क्या चाहते हो” हे ‘थ्री इडियट्स’ मधील वाक्य सहज प्रेक्षकांच्या ओठी येतं. अच्युत पोतदार यांच्या त्या प्रश्नाचे अनेक मिम्स व्हायरल झालेत. “हम यहा आपकी सेवा करने के लिए ही तो बैठे है,” असं म्हणत श्रीनिवास वागळे यांचं लायसन्स देणारा ‘वागळे की दुनिया’ मालिकेतला ऑफिसर अच्युत पोतदार अनेकांना आठवत असतील. त्यांनी हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टीमध्ये आपल्या तगड्या अभिनयाने नावलौकिक मिळविला आहे. अच्युत पोतदार हे अर्थशास्त्राचे गोल्ड मेडलिस्ट प्राध्यापक, भारतीय सैन्य दलात दाखल होऊन भारत-पाकिस्तान युध्दात आपल्यावर सोपवलेली कामगिरी फत्ते करणारे कर्तव्यदक्ष कॅप्टन, त्यानंतर इंडियन ऑईलमध्ये अधिकारी पद या भूमिका चोख पार पाडून अभिनय क्षेत्रात स्वतःला आजमावून पाहण्यासाठी त्यांनी अनेक भूमिका केल्या आणि प्रेक्षकांचा पाठिंबा मिळविला.
हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजविणाऱ्या अच्युत पोतदार यांना झी मराठीने प्रदान केला जीवनगौरव पुरस्कार! - झी मराठी जीवनगौरव पुरस्कार २०२१
अभिनेता आमीर खानला मशीनची पुस्तकी व्याख्या विचारणारा प्राध्यापक म्हणजेच अच्युत पोतदार आपल्याला आठवत असेल. “कहना क्या चाहते हो” हे ‘थ्री इडियट्स’ मधील वाक्य आजही तरुणाईच्या तोंडी आहे आणि त्याचे शेकडो मिम्सही लोकप्रिय आहेत. अच्युत पोतदार हे अर्थशास्त्राचे गोल्ड मेडलिस्ट प्राध्यापक, भारतीय सैन्य दलात दाखल होऊन भारत-पाकिस्तान युध्दात भागही घेतला होता. अशा या हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजविणाऱ्या अच्युत पोतदार यांना झी मराठीने जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
अच्युत पोतदार