मुंबई - सुशांतसिंहच्या निधनात संपूर्ण चाहता वर्ग शोकसागरात बुडालेला आहे. त्याचे व्हिडिओ आणि फोटो रोज शेअर केले जातात. आता त्याचा एक व्हिडिओ शेअर झालाय तो त्याच्या घरी पार पडलेल्या प्रार्थना सभेचा आहे. हा व्हिडिओ खूप लोक शेअर करीत आहेत.
सुशांतच्या प्रार्थना सभेचा व्हिडिओ व्हायरल, पाहून तुम्हीही व्हाल भावूक - Sushant Sing Rajput prayer meet
सुशांतसिंहच्या निधनानंतर सोशल मीडियावर नेहमी त्याच्याच मृत्यूच्या बातम्या असतात. त्याचे चाहते आपला शोक सावरत असताना त्याच्या आठवणी जपण्यासाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करीत असतात. अलिकडेच त्याच्या घरी प्रर्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
सुशांतच्या पाटणा येथील घरी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याची तस्वीर फुलांनी सजवलेली होती. त्यासमोर त्याचे कुटुंबिय आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रर्थना करताना व्हिडिओमध्ये दिसतात. यात त्याचे वडिल के के सिंह, बहिण श्वेता सिंह किर्ती आणि इतर कुटुंबिय शोक व्यक्त करताना मंत्र वाचताना दिसतात.
सुशांतच्या निधनानंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा चर्चेत आला आहे. अनेक सेलेब्स आणि चाहत्यांनी त्याच्या मृत्यूला फिल्म इंडस्ट्रीतील प्रस्थापित लोक जबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्याच्या मत्यूनंतर अनेकांची चौकशी पोलीस करीत आहेत. अद्यापही त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही.