महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

यशराज फिल्म्ससोबत एकत्र येणार अक्षय कुमार, 'पृथ्वीराज'चा टीझर प्रदर्शित - राजा पृथ्वीराज चौहाण

यशराज फिल्म्सच्या सुवर्ण वर्षानिमित्त एतिहासिक चित्रपट तयार करण्यचा निर्णय यशराज फिल्म्सने घेतला होता. त्यामुळे राजा पृथ्वीराज चौहाण यांची महागाथा आता पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

यशराज फिल्म्ससोबत एकत्र येणार अक्षय कुमार, 'पृथ्वीराज'चा टीझर प्रदर्शित

By

Published : Sep 9, 2019, 10:08 AM IST

मुंबई -बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार याचा आज ५२ वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक खास सरप्राईझ मिळालं आहे. अक्षय लवकरच 'पृथ्वीराज' या चित्रपटात झळकणार आहे. यशराज फिल्मअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. आज अक्षयच्या वाढदिवशीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

यशराज फिल्म्सच्या सुवर्ण वर्षानिमित्त एतिहासिक चित्रपट तयार करण्यचा निर्णय यशराज फिल्म्सने घेतला होता. त्यामुळे राजा पृथ्वीराज चौहाण यांची महागाथा आता पडद्यावर पाहायला मिळणार आहे. निर्माता आदित्य चोप्राने या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली होती. त्यानंतर आज अक्षय कुमारच्या वाढदिवसाचं निमित्त साधुन चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

अक्षयने देखील त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे.

हेही वाचा -चित्रपट साईन केल्याच्या वृत्तावर शाहरुखनं सोडलं मौन, शेअर केली पोस्ट

१९७० साली झाली होती 'यशराज फिल्म्स'ची स्थापना
यशराज फिल्मची स्थापना सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यश राज चोप्रा यांनी केली होती. त्याचे मोठे भाऊ बलदेव राज चोप्रा यांच्यासोबत शेवटचा 'इत्तेफाक' हा चित्रपट झाल्यानंतर यश राज हे वेगळे झाले. यशराज फिल्म्सच्या अतंर्गत तयार झालेला पहिला चित्रपट हा 'दाग' होता. या चित्रपटात राजेश खन्ना, शर्मिला टागोर आणि राखी मुख्य भूमिकेत होते. १९७३ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

अक्षय कुमारला आदित्य चोप्राकडून मिळाले सरप्राईझ -
'पृथ्विराज' हा चित्रपट पुढच्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. पुढचे वर्ष हे यशराज फिल्म्सचे सुवर्ण वर्ष असणार आहे. त्यामुळे यशराजच्या पहिल्या चित्रपटात राजेश खन्ना तर, आता 'पृथ्वीराज'मध्ये राजेश खन्नाचा जावई असणारा अक्षय झळकणार असल्यामुळे हा क्षण आदित्य चोप्रासाठी खास ठरणार आहे. तसंच आज अक्षयचा वाढदिवस असल्यामुळे त्याने या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करुन अक्षयला आणि अक्षयच्या चाहत्यांनाही खास भेट दिली आहे.

हेही वाचा-Bday Spl: अक्षय कुमारचा 'खिलाडी' ते 'हिट मशीन' पर्यंतचा 'फिल्मी' प्रवास...!

ABOUT THE AUTHOR

...view details