मुंबई (महाराष्ट्र) - KGF मधील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता यश आपला वाढदिवस साजरा करीत आहे. या खास प्रसंगी यशने इंस्टाग्रामवर आपल्या मुलांसोबत आणि पत्नीसोबत वाढदिवसाचा केक कापतानाचा फोटो शेअर केला आहे.
फोटोत तो त्याच्या वाढदिवसाच्या केकसमोर उभा असून आपल्या मुलाला आणि मुलीला धरलेले दिसत आहे. फोटोसोबत, यशने एक टीप लिहिली आहे त्यात त्याने शेअर केले की तो त्याच्या वाढदिवसाबद्दल कधीही उत्साही असत नाही.
"वाढदिवसामुळे मी कधीच उत्तेजित होत नाही... मला आजूबाजूला आनंद दिसत आहे, विशेषत: माझ्या लहान मुलांमुळे, तो मला पुढे नेत असतो. प्रेम आणि आशीर्वादांसाठी माझ्या प्रत्येक चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे आभार मानण्याची ही संधी घेऊ इच्छितो. आशा आहे की प्रत्येकजण सुरक्षित आहात. काळजी घ्या," असे यशने लिहिले आहे.