महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

काही बुद्धिहीन लोकांमुळे नेपोटिझ्म हा शब्द चमकला आहे - आदित्य सील - आदित्य सील नेपोटिझ्मवर बोलला

बॉलिवूडमध्ये घराणेशाहीचा मुद्दा महत्त्वाचा नसल्याचे अभिनेता आदित्य सील याला वाटते. काही बुद्धिहीन लोकांमुळे हा शब्द चर्चेत आला असल्याचेही त्याने म्हटले आहे. तो आऊटसायडर असूनही त्याच्या गुणवत्तेच्या जोरावर आदित्यला करण जोहरने लॉन्च केले होते.

Aditya Seal
आदित्य सील

By

Published : Sep 8, 2020, 3:50 PM IST

मुंबई- बॉलिवूडचा आऊटसायडर आदित्य सील हा चित्रपट उद्योगात घराणेशाहीचा दबदबा आहे या आरोपाशी सहमत नाही आणि नाव न घेता काही बुद्धिहीन लोकांमुळे हा शब्द चर्चेत आला आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने सर्वप्रथम चित्रपट निर्माते करण जोहरच्या शो 'कॉफी विथ करण' मध्ये जाऊन नेपोटिझ्मचा मुद्दा उपस्थित केला होता आणि असंही म्हटलं आहे की करण इंडस्ट्रीमध्ये घराणेशाहीचा ध्वजवाहक आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर पुन्हा एकदा हा मुद्दा पुढे आला कारण सुशांत देखील एक आऊटसायडर कलाकार होता आणि त्याच्या निधनानंतर असे म्हटले जात होते की त्याच्याबाबतीत इंडस्ट्रीमध्ये भेदभाव केला जात असे.

2019 मध्ये करण जोहर निर्मित 'स्टुडंट ऑफ द ईयर 2' या चित्रपटात आदित्यने काम केले आहे. आदित्यने सांगितले की, "मी 'एक छोटी लव्ह स्टोरी' आणि 'पुरानी जीन्स' असे चित्रपट केले आहेत ज्यामध्ये मला लॉन्च केले होते. आणखी दुसरा चित्रपट होता 'तुम बिन 2', ज्यामध्ये मला पुन्हा लाँच केले होते, त्यानंतर मी 'स्टुडंट' केले 'ऑफ द ईयर 2' मध्ये देखील काम केले, म्हणून एकंदर इनसाइडर-आऊटसाइडर पूर्णपणे माझ्या समजेच्या बाहेरचे आहे, कारण बाहेरचा असूनही माझी ओळख बर्‍याच वेळा झाली आहे. "

कोणाचेही नाव न घेता तो पुढे म्हणाला की 'नेपोटिझम' हा शब्द चुकीच्या पद्धतीने लोकांच्या नजरेत आणला गेला आहे आणि तो फक्त मूर्खपणाचा आहे.

आदित्य म्हणतो, "हा शब्द चमकवला गेला आहे. कोणी अक्कल नसलेल्या व्यक्तीने या शब्दाला ग्लॅमर दिले गेले आहे. त्याने याचा विचार करायला हवा होता. हे फक्त मूर्ख आहे."

आगामी काळात आदित्य 'अनामिका'मध्ये दिसणार आहे. चार चित्रपटांचा भाग असलेली ही एक कहाणी. प्रियदर्शन त्याचे दिग्दर्शक आहेत

ABOUT THE AUTHOR

...view details