चेन्नई- गेले काही वर्षे सुपरस्टार रजनीकांत तामिळनाडूच्या राजकारणात सक्रिय होणार अशी चर्चा आपण ऐकत आलो आहोत. या पार्श्वभूमीवर त्यांनी रजनीकांत मक्कल मंड्राम या राजकीय पक्षाची घोषणाही केली होती. या पक्षाचे लॉन्चिंग ३१ डिसेंबरला करण्याचा निर्णय त्यांनी रजनी मक्कल मंडरम या संघटनेतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन घेतला होता. मात्र तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी आपल्य पक्षाचे लॉन्चिंग रद्द केले आहे. रजनीकांत यांनी आपल्या ट्विटरवरुन त्यांनी ही घोषणा केली आहे.
रजनीकांत यांना रुग्णालयातून मिळाली होती सुट्टी
हैदराबादमध्ये रजनीकांत यांच्या अण्णात्थे चित्रपटाच्या शुटिंग सेटवर काही क्रू मेंबर्सना कोरोनाची लागण झाल्यानंतर हे सुटिंग थांबवण्यात आले होते. त्यानंतर क्वारंटाईनमध्ये असलेल्या रजनीकांत यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्यानंतर ते हैदराबादच्या अपोलो रुग्णालयाद दाखल झाले होते. दोनच दिवसापूर्वी त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.
रजनीकांत मक्कल मंड्रामचे लॉन्चींग रद्द
रजनीकांत यांचा ७० वा वाढदिवस चाहत्यांनी जोरदार साजरा केला. त्याचवेळी त्यांनी ३१ डिसेंबरला रजनीकांत मक्कल मंड्राम या पक्षाचे लॉन्चिंग होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणाला कोणते नवे वळण मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र आता तरी हे लॉन्चिंग पुढे ढकलले गेल्याचे दिसत आहे.
गेली दोन वर्षे रजनीकांत राजकारणात सक्रिय आहेत. परंतु, अधिकृतपणे त्यांनी अद्याप राजकारणात प्रवेश केलेला नाही. यापूर्वी अभिनेते आणि राजकीय नेते कमल हासन (मक्कल निधी माईम पक्षाचे अध्यक्ष) आणि रजनीकांत यांनी तमिळनाडूच्या कल्याणासाठी एकत्र येऊन काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.