लॉस एंजल्स - बदुप्रतिक्षित हॉलिवूडपट 'वंडर वुमन १९८४' मध्ये दोन खलनायकाची दोन पात्रे दाखवण्यात येणार आहेत. मात्र, हे पुर्वनियोजित नसून पटकथेच्या ओघात झाले असल्याची माहिती दिग्दर्शक पॅटी जेंकिन्स हिने स्पष्ट केले. 'वंडर वुमन १९८४' हा जेंकिन्सच्या २०१७ मधील 'वंडर वुमन' सिनेमाचा सिक्वेल आहे. यात अभिनेत्री गाल गॅडो हिने सुपर वुमनची भूमिका केली आहे.
'वंडर वुमन'ला करावा लागणार दोन खलनायकांचा सामना; दिग्दर्शक पॅटी जेंकिन्सने सांगितले कारण - वंडर वुमन १९८४ खलनायक
'वंडर वुमन १९८४' हा चित्रपट येत्या ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणार आहे. यात वंडर वुमनला बार्बरा अॅन आणि मॅक्सवेल लॉर्ड या दोन खलनायकांचा सामना करावा लागणार आहे. बार्बरा अॅनची भूमिका क्रिस्टीन विग साकारत असून पेद्रो पास्कल हा मॅक्सवेल लॉर्डच्या भूमिकेत आहे.
वंडर वुमन १९८४
'वंडर वुमन १९८४' हा चित्रपट येत्या ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणार आहे. यात वंडर वुमनला बार्बरा अॅन आणि मॅक्सवेल लॉर्ड या दोन खलनायकांचा सामना करावा लागणार आहे. बार्बरा अॅनची भूमिका क्रिस्टीन विग साकारत असून पेद्रो पास्कल हा मॅक्सवेल लॉर्डच्या भूमिकेत आहे. पटकथा पुढे सरकताना दोन खलनायकांची आपोआप आवश्यकता निर्माण झाली. त्यामुळे दुसऱ्या खलनायकाचा प्रवेश झाला, असे दिग्दर्शक पॅटी जेंकिन्सने एका मुलाखतीत दिली.