मुंबई- आज जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात सगळीकडे साजरा होत आहे. महिला प्रत्येक क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण करताना सध्या दिसत आहेत. मग यात चित्रपटसृष्टी तरी माघे कशी राहिल. महिला दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊया असेच काही चित्रपट, जे कोणत्याही अभिनेत्याशिवाय हिट ठरले.
१. नीरजा - सोनम कपूरची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात कोणत्याही अभिनेत्याची भूमिका नव्हती. सोनमने स्वतःच्या बळावर या चित्रपटातील उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार गल्ला जमावला. हा चित्रपट नीरजा भानोत या शूर उड्डाणसेविकेवर आधारित होता.
२.क्वीन - कंगना रनौतची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात राजकुमार रावदेखील झळकला होता. मात्र, यात त्याच्या भूमिकेला तितकासा वाव नव्हता. त्यामुळे, चित्रपटाच्या यशाचे संपूर्ण श्रेय कंगनाला गेले. चित्रपटात कंगनाने राणी नावाच्या एका मुलीचे पात्र साकारले आहे.
३. राझी - आलिया भट्टची भूमिका असलेल्या या चित्रपटात कोणताही प्रसिद्ध अभिनेता झळकला नाही. मात्र, असं असतानाही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. या चित्रपटात आलिया एका महिला गुप्तहेराच्या भूमिकेत होती.