अलिकडेच रिलीज झालेला 'थप्पड' हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भावला. आतापर्यंत २२ कोटीचा व्यवसाय या सिनेमाने केलाय. तापसी पन्नू मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमात दिया मिर्जा, नैला ग्रेवाल आणि तन्वी आजमी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
२०२० मध्ये बॉलिवूडवर राज्य करणार या महिला बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणचा 'छपाक' हा चित्रपट या वर्षाच्या सुरुवातीला रिलीज झाला. लक्ष्मी अग्रवाल यांच्या सत्यकथेवर आधारित हा चित्रपट होता. अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या महिलेची, ही प्रेरणादायी कथा प्रेक्षकांच्या मनाला भावली. 'छपाक'ने ३२.४८ कोटीचा गल्ला बॉक्स ऑफिसवर जमवला.
२०२० मध्ये बॉलिवूडवर राज्य करणार या महिला यावर्षीच्या प्रजासत्ताकदिनी रिलीज झालेल्या 'पंगा' या चित्रपटाने २५.६४ कोटीचा गल्ला जमवला असला, तरी याचा मोठा प्रभाव प्रेक्षकांच्या मनावर पडला. कंगना रानावतची यात प्रमुख भूमिका होती. चित्रपटाची कथा एका माजी कबड्डीपटूची होती. बऱ्याच वर्षानंतर पुन्हा मैदानात उतरलेल्या महिला कबड्डीपटूची भूमिका कंगनाने साकारली होती.
२०२० मध्ये बॉलिवूडवर राज्य करणार या महिला यंदा अनेक महिला केंद्रीत चित्रपट येऊ घातलेत. यातलाच एक चित्रपट आहे 'शकुंतला देवी- ह्यूमन कंप्यूटर'. प्रसिध्द गणितशास्त्रावर बनलेल्या या चित्रपटात मुख्य भूमिका विद्या बालन साकारणार आहे.
२०२० मध्ये बॉलिवूडवर राज्य करणार या महिला जान्हवी कपूरची प्रमुख भूमिका असलेला 'गुंजन सक्सेनाः द कारगिल गर्ल' हा चित्रपट आकर्षण असणार आहे. कारगिलच्या युध्दात शौर्य दाखवलेल्या गुंजन सक्सेना या एअरफोर्स पायलटची ही सत्यकथा आहे.
२०२० मध्ये बॉलिवूडवर राज्य करणार या महिला परिणीती चोप्रा एक सायकॉलॉलिजीकल थ्रिलर चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हॉलिवूडच्या गाजलेल्या 'द गर्ल ऑन द ट्रेन' या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे.
२०२० मध्ये बॉलिवूडवर राज्य करणार या महिला 'कबीर सिंह' या चित्रपटातून चर्चेत आलेली कियारा अडवाणी आता 'इंदू की जवानी' या चित्रपटातून प्रेक्षकांना भेटणार आहे. 'कबीर सिंह'पेक्षा यात तिची दमदार भूमिका असणार आहे.
२०२० मध्ये बॉलिवूडवर राज्य करणार या महिला 'पंगा' चित्रपटानंतर कंगना रानावत आता जयललिता यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. 'थलाइवी' असे या चित्रपटाचे शीर्षक असून अभिनेत्री ते तामिळनाडूची मुख्यमंत्री असा प्रेरणादायी प्रवास आपल्याला जयललितांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे.
२०२० मध्ये बॉलिवूडवर राज्य करणार या महिला ग्रँड सेटवर सिनेमा बनवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या संजय लीला भन्साळी यांच्या 'गंगूबाई काठियावाड़ी' या चित्रपटातून आलिया भट्ट झळकणार आहे. वेश्यालयाची मालकीन असलेल्या गंगूबाईच्या भोवती या चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. वरील चित्रपट पाहता २०२० हे वर्ष महिला अभिनेत्रींसाठी खूपच यशदायी ठरू शकते.
२०२० मध्ये बॉलिवूडवर राज्य करणार या महिला