मुंबई - दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'शिकारा' हा चित्रपट ७ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात १९८९ च्या शेवटचा काळ ते १९९० च्या सुरुवातीच्या काळात काश्मिरी पंडितांना बेघर व्हावे लागले होते. त्यांच्यावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी विधु विनोद चोप्रा यांनी स्पेशल स्क्रिनिंग आयोजित केली होती. यादरम्यान एक महिला विधु विनोद चोप्रा यांच्यावर भडकलेली दिसली. तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये ही महिला म्हणते, की 'पंडित समुदायाला त्यावेळी कोणत्या परिस्थितीतुन जावे लागले याचे योग्य पद्धतीने या चित्रपटात दाखवण्यात आले नाही. त्यावेळी इस्लाम कट्टरपंथीयांकडून झालेला जनसंहार, सामुहिक अत्याचार आणि हत्या यांसारख्या घटनांना चित्रपटात योग्य पद्धतीने मांडण्यात आले नाही. या चित्रपटाला व्यावसायिक रुप देण्यात आले आहे. या व्यावसायिकरणासाठी तुमचे अभिनंदन', अशा शब्दात या महिलेने आपला संताप व्यक्त केला.
हेही वाचा -अभिनेत्री काम्या पंजाबीने उरकला साखरपुडा, पाहा फोटो