हॉलिवूडचा 'जेमिनी मॅन' हा एक जबरदस्त अॅक्शन चित्रपट येत्या ११ ऑक्टोबरला भारतासह जगभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे नवे पोस्टर आता प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. विल स्मीथच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट पर्वणी ठरणार आहे.
विल स्मिथचा अफाट अॅक्शन असलेला 'जेमिनी मॅन' येतोय प्रेक्षकांच्या भेटीला - निर्माता आंग ली
'जेमिनी मॅन' चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज झाले आहे. याच्या ट्रेलरला जगभर जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. 'जेमिनी मॅन' 11 ऑक्टोबर 2019 रोजी भारतात हिंदी, तामिळ, तेलुगु आणि इंग्रजी भाषेत थिएटरमध्ये झळकेल.
![विल स्मिथचा अफाट अॅक्शन असलेला 'जेमिनी मॅन' येतोय प्रेक्षकांच्या भेटीला](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4344012-thumbnail-3x2-will.jpg)
'जेमिनी मॅन' या चित्रपटात विल स्मिथ हा हेन्री ब्रॉगन ही व्यक्तीरेखा साकारत आहे. तो एक खतरनाक खुनी आहे, त्याचा शोध एक रहस्यमय तरुण घेताना दिसतो. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसापूर्वी प्रदर्शित झाला होता. त्याला जगभरच्या प्रेक्षकांनी आपली पंसती दिली होती.
या चित्रपटाचे दिग्दर्शन अॅकॅडमी अवॉर्ड जिंकणारा चित्रपट निर्माता आंग ली यांनी केले आहे. प्रख्यात निर्माते जेरी ब्रूकहीमर, डेव्हिड एलिसन, डाना गोल्डबर्ग आणि डॉन ग्रेंजर यांनी निर्मिती केली आहे. मेरी एलिझाबेथ विन्स्टेड, क्लाईव्ह ओवेन आणि बेनेडिक्ट वोंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'जेमिनी मॅन' 11 ऑक्टोबर 2019 रोजी भारतात हिंदी, तामिळ, तेलुगु आणि इंग्रजी भाषेत थिएटरमध्ये झळकेल.