महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

"कंगनाचे समर्थन हा मुर्खपणा, यापुढे विक्रम गोखलेंसोबत काम करणार नाही"

1947 ला मिळालेले स्वातंत्र्य हे भीक होते (The independence we got in 1947 was begging), खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले होते, असे कंगना एका मुलाखतीत म्हणाली होती. कंगनाच्या मताशी मी सहमत आहे, जेव्हा स्वातंत्र्यासाठी वीर फासावर जात होते तेव्हा तत्कालिन पुढाऱ्यांनी त्यांना वाचवले नाही. हेच लोक नंतर भारताच्या केंद्रीय मंत्रीमंडळात होते, असे विक्रम गोखलेंनी म्हटले होते. विक्रम गोखलेंवर चोहोबाजूनी टीकाही होत आहे. अशातच मराठी चित्रपटाचे निर्माते निलेश नवलाखा (Nilesh Navalakha) यांनी ट्विट करुन यापुढे विक्रम गोखलेंसोबत काम करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

निलेश नवलखा आणि विक्रम गोखले
निलेश नवलखा आणि विक्रम गोखले

By

Published : Nov 18, 2021, 4:22 PM IST

ज्येष्ठ अभिनेता विक्रम गोखले (Veteran Actor Vikram Gokhale) यांनी कंगना रणौतची (Kangana Ranaut) पाठराखण करण्याचा प्रयत्न केला होता. 1947 ला मिळालेले स्वातंत्र्य हे भीक होते (The independence we got in 1947 was begging), खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले होते, असे कंगना एका मुलाखतीत म्हणाली होती. कंगनाच्या मताशी मी सहमत आहे, जेव्हा स्वातंत्र्यासाठी वीर फासावर जात होते तेव्हा तत्कालिन पुढाऱ्यांनी त्यांना वाचवले नाही. हेच लोक नंतर भारताच्या केंद्रीय मंत्रीमंडळात होते, असे विक्रम गोखलेंनी म्हटले होते. यावर सोशल मीडिया, वर्तमानपत्रे व टीव्ही वाहिन्यांमध्ये भरपूर चर्चा झडताना दिसते. विक्रम गोखलेंवर चोहोबाजूनी टीकाही होत आहे. अशातच मराठी चित्रपटाचे निर्माते निलेश नवलाखा (Nilesh Navalakha) यांनी ट्विट करुन यापुढे विक्रम गोखलेंसोबत काम करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

कोण आहेत निलेश नवलखा?

निर्माते निलेश नवलाखा हे नाव मराठी चित्रपटसृष्टीत खूप महत्त्वाचे आहे. त्यांनी शाळा, फँड्री यासारख्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमांची निर्मिती केली आहे. मराठी सिनेसृष्टीतील अनेक संवेदनशील कलाकार व तंत्रज्ञांनी विक्रम गोखले यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

निलेश नवलखांची उघड भूमिका

निलेश नवलखा यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, ''मी विक्रम गोखले बरोबर काम केले आहे, कलाकार म्हणुन मला त्यांचा प्रचंड अभिमान आहे परंतु त्यांनी कंगना रणौत जे बोलली त्याचं समर्थन करणे म्हणजे महामूर्खपणा आहे 9Kangana's Support Is Stupidity). जे काही ते बोलले त्याचा मनापासून धिक्कार करतो व भविष्यात त्यांच्या बरोबर काम करणार नाही हे पण घोषीत करतो.''

काय आहे प्रकरण?

कंगना रणौत (Kangana Ranaut) हिने जे काही वक्तव्य केले आहे, ते बरोबर आहे, असे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram gokhale) म्हणाले. स्वतंत्र हे आपल्याला दिले गेलेले आहे. जे स्वतंत्र योद्धा स्वातंत्र्यासाठी लढत होते, ते जेव्हा फाशीवर चढत होते तेव्हा त्याकाळचे मोठ्या लोकांनी त्यांना वाचवले नाही आणि ते लोक स्वातंत्र्यानंतर केंद्रीय मंत्री झाले, असे देखील यावेळी गोखले म्हणाले. आपण कोणत्याही पक्षाशी, राजकारण्याशी संबंधित नाही असे ते म्हणाले, मात्र दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीं(Narendra Modi)च्या कामाचे कौतुक करत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा - Preity Zinta : ४६ व्या वर्षी प्रीति झिंटाने दिला जुळ्यांना जन्म, लग्नाच्या ५ वर्षांनी दिली Goodenough न्यूज

ABOUT THE AUTHOR

...view details