महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

पाहा, सोनाक्षीच्या मागे सगळ्यांनी का लपवले चेहरे? 'खानदानी शफाखाना'चे पोस्टर - Sonakshi Sinha

खानदानी शफाखानाच्या पोस्टरमध्ये सोनाक्षी सिन्हाच्या मागे लोक लपले आहेत. यावरुनच या चित्रपटाबद्दलची उत्सुकता ताणलेली दिसत आहे.

'खानदानी शफाखाना'चे पोस्टर

By

Published : Jun 19, 2019, 9:58 PM IST


मुंबई - बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने 'खानदानी शफाखाना' चित्रपटाची पहिली झलक दाखवली आहे. चित्रपटाचे पहिले पोस्टर लॉन्च करण्यात आले असून एकंदरीत उत्कंठा वाढवणारे हे पोस्टर आहे.

पोस्टरच्या शीर्षकाखाली सेक्स क्लिनिक असे लिहिले आहे. यात मध्यभागी सोनाक्षी सिन्हा दिसत आहे. तिच्या मागे अनेकजण आपला चेहरा लपवून उभे असलेले दिसतात. यात अनेकांनी चेहरा झाकण्यासाठी बादली, पिशव्या, पेपर, कानटोप्या, मॅगझिन यांचा आधार घेतलेला दिसतो.

पोस्टरच्या खाली 'मैं जितना बोलूंगी लोगों को उतनी ही शर्म आनी है', असे लिहिले आहे. एकंदरीत पोस्टर पाहाता एकदम हटके विषयावरचा हा चित्रपट असेल याची खात्री पटते.

'खानदानी शफाखाना'चे पोस्टर

'खानदानी शफाखाना' चित्रपट २६ जुलैला रिलीज होणार आहे. शिल्पी दासगुप्ता यांनी याचे दिग्दर्शन कले असून भूषण कुमार, म्रीगदिप सिंग लांबा आणि महावीर जैन याचे निर्माता आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details