महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कार्तिक आर्यन २० दिवसात पूर्ण करणार 'धमाका'चे शुटिंग!! - कार्तिक आयर्न २० दिवसात पूर्ण करणार शुटिंग

अभिनेता कार्तिक आर्यन कित्येक महिन्यांनंतर सेटवर परत आला आहे. कार्तिक एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत आगामी 'धमाका' चित्रपटाचे शुटिंग संपवणार आहे. शुटिंग वेळेत पूर्ण व्हावे यासाठी चित्रपटाची संपूर्ण टीम मुंबईतील एका हॉटेलमध्ये २० दिवसांसाठी एकत्र राहणार आहे.

Sooting Dhamaka
धमाका'चे शुटिंग

By

Published : Dec 19, 2020, 2:34 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याच्या हातामध्ये अनेक चित्रपट आहेत. कार्तिकने आपल्या आगामी 'धमाका' चित्रपटाचे शूटिंग किकस्टार्ट केले असून हा चित्रपट अवघ्या 20 दिवसांत पूर्ण होईल.

थ्रिलर 'धमका'साठी कार्तिकने राम माधवानीसोबत काम केले आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला यापूर्वीच टीमने सुरुवात केली आहे आणि आता चित्रपटाचे दिग्दर्शक राम यांनी प्री-प्रॉडक्शनवर इतके चांगले काम केले आहे की, तो २० दिवसांत शूटिंग संपवण्याचा विचार करीत आहे. सर्व काही नियोजनानुसार झाल्यास, टीम एक नवीन विक्रम स्थापित करेल.

प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी, निर्मात्यांनी २०दिवस मुंबईत एक संपूर्ण हॉटेल बुक केले आहे जिथे टीम थांबली आहे आणि शुटिंग करत आहे. कोविड -१९ पासून काम करणाऱ्या टीमचे रक्षण करण्यासाठी निर्मात्यांनी हॉटेलच्या क्रूलादेखील सहभागी करुन घेतले आहे आणि प्रत्येकजण पुढच्या २० दिवस हॉटेलमध्ये राहणार आहे.

'धमाका'मध्ये, कार्तिक मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे थेट प्रक्षेपण करणारा पत्रकार म्हणून काम करणार आहे. आपल्या कारकीर्दीतील पहिल्याच थ्रिलरमध्ये सहभाग घेण्यासाठी तो किती उत्साही आहे याविषयी बोलताना कार्तिकने पूर्वी सांगितले होते की, "ही माझ्यासाठी एक चमत्कारिक पटकथा आहे आणि कथा ऐकताना मी जागेवरुन हललो नव्हतो. एक कलाकार म्हणून माझी वेगळी बाजू दाखवण्याची संधी मला या कथेमुळे मिळाली आहे. "

हेही वाचा -सलोनी गौरच्या नव्या 'रनआऊट' व्हिडिओवर कंगना भडकली

रॉनी स्क्रूवाला आणि आर.एस.वी.पी. सहनिर्माते अमिता माधवानी यांच्यासह राम माधवानी फिल्म्स निर्मित हा चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधणारा ठरु शकतो.

हेही वाचा -नुसरत भरुचाला 'छोरी'च्या शूटिंगच्यावेळी अश्रू अनावर

ABOUT THE AUTHOR

...view details