हैदराबाद: यंदाच्या ९४व्या अकादमी पुरस्कारांसाठी (Oscar 2022 Nomination) नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांकडून भारताला अनेक अपेक्षा होत्या. 'जय भीम' ( Jay Bhim ) हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या नामांकना यादीत असेल अशी आशा बाळगण्यात आली होती. मात्र तसे घडले नाही. यावर्षी 'रायटिंग विथ फायर' ( Writing With Fire ) या माहितीपटाने सर्वोत्कृष्ट माहितीपट वैशिष्ट्य श्रेणीमध्ये ( Best Documentary Feature category ) नामांकन मिळवून आपली उपस्थिती नोंदवली आहे. या वर्षीच्या ऑस्करसाठी नामांकन मिळालेला रायटिंग विथ फायर हा एकमेव भारतीय चित्रपट आहे.
रायटिंग विथ फायरची कथा काय आहे?
ऑस्कर नामांकन 2022 च्या शर्यतीत 'रायटिंग विथ फायर' या स्पर्धेत असेन्शन, अटिका, फ्ली आणि समर ऑफ सोल देखील आहेत. 'रायटिंग विथ फायर' या माहितीपटाचे दिग्दर्शन रिंटू थॉमस आणि सुष्मित घोष यांनी केले आहे. 'रायटिंग विथ फायर' या कथेबद्दल बोलताना दलित महिलांनी चालवल्या जाणाऱ्या 'खबर लहरिया' या वृत्तपत्राची कथा सांगितली आहे. बुंदेलखंड प्रदेशातील चित्रकूट येथे 2002 मध्ये दिल्लीस्थित एनजीओ 'निरंतर' ने याची सुरुवात केली होती.
वृत्तपत्रातून या मुद्द्यावर उठवला होता आवाज