महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 14, 2021, 8:12 PM IST

ETV Bharat / sitara

'आमच्या रोजंदारी कामगारांचं काय?’, सिने वर्कर्स असोशिएशनचा सरकारला सवाल!

ऑल इंडिया सिने वर्कर्स असोशिएशन (AICWA) ने लॉकडाऊनला सपोर्ट दिला असला तरी सरकारने मनोरंजनसृष्टीतील दिवसपगारी कामगारांबाबत काहीच धोरण न आखल्यामुळे नाराजी प्रकट केली आहे. त्यांच्यामते सरकार मनोरंजनसृष्टीतील कामगारांना सापत्न वागणूक देत आहे.

AICWA
ऑल इंडिया सिने वर्कर्स असोशिएशन

ऑल इंडिया सिने वर्कर्स असोशिएशन (AICWA) ने लॉकडाऊन ला सपोर्ट दिला असला तरी सरकारने मनोरंजनसृष्टीतील दिवसपगारी कामगारांबाबत काहीच धोरण न आखल्यामुळे नाराजी प्रकट केली आहे. त्यांच्यामते सरकार मनोरंजनसृष्टीतील कामगारांना सापत्न वागणूक देत आहे. इतर कामगारांसाठी भलीमोठी पॅकेजेस घोषित केली असली तरी मनोरंजनसृष्टीतील स्पॉट बॉईज, मेक अप आर्टिस्ट, हेयर आर्टिस्ट, कॅमेरा असिस्टंट्स, कॉस्चुम डिपार्टमेंट वर्कर्स आणि इतर कामं करणाऱ्या इतर अनेकांना हातावर हात धरून बसण्याची वेळ आली आहे.

सिने वर्कर्स असोशिएशनचा सरकारला सवाल
मनोरंजन उद्योगाचे केंद्र असलेले मुंबईतील कलाकारांव्यतिरिक्त बरेच लोक फिल्म आणि टीव्ही सेटवर काम करून आपली रोजीरोटी कमवतात. २०२० मध्ये कोरोनाव्हायरसने हा उद्योग थांबविल्यामुळे एकंदरीतच या व्यवसायात बरेच बदल झाले आहेत. गेल्या वर्षी देशभरातील लॉकडाऊनमुळे चित्रपटगृह बंद होते तर शूटिंग आणि इतर मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. जून २०२० मध्ये जेव्हा तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर चित्रपट आणि टेलिव्हिजन मालिकांचे चित्रीकरण करण्यास परवानगी मिळाली. आता कुठे परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे असे वाटत असतानाच पुन्हा एका नवीन लॉकडाऊन ला सामोरे जावे लागत आहे.कालच महाराष्ट्राचे मा मुख्यमंत्री यांनी १५ दिवसांची कडक संचारबंदी (लॉकडाऊन हा शब्द टाळून) लागू केल्यामुळे पुन्हा एकदा मनोरंजनसृष्टीतील दिवसपगारी कामगारांचं मोठं नुकसान होणार आहे. लॉकडाऊनमुळे या रोजंदारी कामगारांच्या घरी चूल कशी पेटणार याची चिंता वाटून राहिली आहे. गेल्या वर्षीच्या आठवणी पुन्हा ताज्या होत आहेत. गेल्यावर्षी अनुकंपेने अनेकांनी त्यांना मदत केली परंतु गेल्या वर्षभरात मदत करणाऱ्यांच्या उत्पन्नात घट झाल्यामुळे आता तेही मदत करण्यास असमर्थ आहेत. त्यातच शासन देत असलेल्या मदतीचा लाभ मनोरंजनसृष्टीतील रोजंदारांना कितपत होतो हादेखील संशोधनाचा भाग आहे. सध्या कोरोनाव्हायरसच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कठोर निर्बंध लादल्याने चित्रपट आणि टीव्ही चालक दल सदस्यांना त्रास होत आहे. मनोरंजनसृष्टीतील कामगार संगठना या गोष्टीबद्दल नाराज आहे की त्यांच्या इंडस्ट्रीकडून सरकारला सर्वाधिक उत्पन्न मिळत असूनही त्याच्या समस्यांचा सरकार दरबारी साधा विचारही होत नाही. खरंतर आताच कुठे गेल्या वर्षीच्या आघातातून सावरत असताना आता पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जावे लागतेय. सर्वजण जागरूक नागरिक म्हणून त्याला पाठिंबाच देताहेत परंतु हातावर पोट असलेल्या नागरिकांचे काय हा सवाल विचारला जातोय. FWICE ने तर कोव्हीड १९ च्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात सापडलेल्या आणि लॉकडाऊन मुळे रोजंदारी गमावलेल्या कामगारांना मदत करण्यासाठी सुपरस्टार सलमान खानकडे मदतीसाठी संपर्क साधला आहे.मनोरंजनसृष्टीत रोजंदारीवर काम करणारीही माणसंच आहेत हे या सर्व संघटना ओरडून सांगत आहेत तेव्हा शासन दरबारी याची दखल घेतली जाईल का असा प्रश्न सिनेवर्तुळात विचारला जातोय.

ABOUT THE AUTHOR

...view details