मुंबई - क्रेकट विश्व आणि सिनेजगत यांचा पुराणा घरोबा आहे. जाहिरातीच्या निमित्ताने क्रिकेटर्स लाईट, कॅमेरा, अॅक्शनला सामोरे जातात आणि मग त्यांच्यातील कलाकार आकार घेऊ लागतो. आता अशा खेळाडूंमध्ये इरफान पठाण सहभागी झालाय.
ब्रेकिंग न्यूज : इरफान पठाण झळकणार मोठ्या पडद्यावर - Irfan Pathan to make his acting debut
छैंय्या विक्रम यांच्या आगामी तामिळ चित्रपटात इरफान पठाण भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही.
तामिळ चित्रपटात इरफान पठाण
छैंय्या विक्रम यांच्या आगामी तामिळ चित्रपटात इरफान पठाण भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. दाक्षिणात्य दिग्दर्शक अजय ग्नानामुथू याचे दिग्दर्शन करीत आहेत. ललीत कुमार यांच्या सेव्हन स्क्रिन स्टुडिओ आणि छंय्या विक्रम यांची ही ५८ वी निर्मिती असेल.
पठाणची झलक असलेला एक व्हिडिओ ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी शेअर केलाय. यात त्यांनी या बातमीला अधिकृत दुजोरा दिलाय.