महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आता पंतप्रधान मोदींवर येणार वेबसीरिज; फर्स्ट लूक प्रदर्शित - biopic

You know the leader, but do you know the man? असे कॅप्शन या फोटोला देण्यात आले आहे. यावरून मोदींचा संघर्ष या सीरिजमध्ये दाखवला जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

मोदी बायोपिक

By

Published : Mar 13, 2019, 2:57 PM IST

मुंबई- सध्या बायोपिकचा जोरदार ट्रेंड बॉलिवूडमध्ये सुरू आहे. डॉ. मनमोहन सिंग, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आता यापाठोपाठ नरेंद्र मोदींवर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता हेच वारे वेबसीरिजकडेही वळाल्याचे पाहायला मिळत आहे. चित्रपटाशिवाय मोदींवर आधारित वेबसीरिजही आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


मोदी असे या वेबसीरिजचे नाव असणार आहे. एप्रिलपासून ही सीरीज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करत याबद्दलची घोषणा करण्यात आली आहे. You know the leader, but do you know the man? असे कॅप्शन या फोटोला देण्यात आले आहे. यावरून मोदींचा संघर्ष या सीरिजमध्ये दाखवला जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

१०२ नॉट आऊट आणि ओह माय गॉडसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक उमेश शुक्ला या वेबसीरिजचे दिग्दर्शन करणार आहेत. ही सीरिज १० भागांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याबद्दल माहिती दिली आहे.


For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details