मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'पी.एम. मोदी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात विवेक ओबेरॉय मोदींच्या भूमिकेत झळकणार आहे. आता त्यांच्या जीवनावर आधारित वेबसीरिजही तयार करण्यात येणार आहे. या वेबसीरीजचे पहिले पोस्टर अलिकडेच रिलीज करण्यात आले आहे.
नरेंद्र मोदींच्या जीवनावरही तयार होणार वेबसीरीज, पहिले पोस्टर रिलीज - इरोस नाऊ
'मोदी' असे या वेबसीरिजचे नाव आहे. या वेबसीरिजमध्ये १० भाग प्रदर्शित करण्यात येणार आहेत. 'इरोस नाऊ' आणि 'बेंचमार्क पिक्चर्स'चे उमेश शुक्ला, आशीष वाघ या वेबसीरिजची निर्मीती करत आहेत.
नरेंद्र मोदींच्या जीवनावरही तयार होणार वेबसीरीज, पहिले पोस्टर रिलीज
होय, 'मोदी' असे या वेबसीरिजचे नाव आहे. या वेबसीरिजमध्ये १० भाग प्रदर्शित करण्यात येणार आहेत. 'इरोस नाऊ' आणि 'बेंचमार्क पिक्चर्स'चे उमेश शुक्ला, आशीष वाघ या वेबसीरिजची निर्मीती करत आहेत.
या वेबसीरिजमध्ये नरेंद्र मोदींच्या आयुष्यातील अनेक घटना दाखविण्यात येणार आहेत. सोशल मीडियावर यातील काही पोस्टर शेअर करण्यात आले आहेत. एप्रिल महिन्यात 'इरोस नाऊ' या डिजिटल प्लॅटफॉर्मवर या वेबसीरिजच्या १० भागांचा प्रिमीअर होणार आहे.