MAKING VIDEO : 'जंगली' चित्रपटासाठी विद्युत जामवालचे थरारक स्टंट - stunts
'जंगली' चित्रपटासाठी विद्युतने मार्शल आर्ट्सचे धडे घेतले आहेत. ग्लोबल मार्शल आर्टिस्ट 'चक रसेल' यांनी यासाठी विद्युतला प्रशिक्षण दिले आहे.
'जंगली' चित्रपटासाठी विद्युत जामवालचे थरारक स्टंट
मुंबई - 'कमांडो' फेम विद्युत जामवालचा 'जंगली' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात विद्युत थरारक स्टंट साकारताना दिसणार आहे. हे स्टंट साकारण्यासाठी त्याने कशाप्रकारे मेहनत घेतली, हे दाखविणारा एक मेकिंग व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे.
'जंगली' चित्रपटासाठी विद्युतने मार्शल आर्ट्सचे धडे घेतले आहेत. ग्लोबल मार्शल आर्टिस्ट 'चक रसेल' यांनी यासाठी विद्युतला प्रशिक्षण दिले आहे.
या चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहत्यांना चित्रपटाबद्दलची उत्सुकता आहे. या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री पुजा सावंत ही देखील झळकणार आहे. २९ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होईल.