मुंबई -बॉलिवूडचा सिंघम अजय देवगन याने आजवर आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सिनेसृष्टीत त्याची ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. या ३० वर्षांत अजयने विविधांगी भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता त्याचा 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्या चित्रपटाचं शतक पूर्ण होत आहे. त्यामुळे त्याचा सिनेसृष्टीतील आत्तापर्यंतचा प्रवास एका खास व्हिडिओद्वारे शेअर करण्यात आला आहे.
हेही वाचा -'तेजाब'ला ३१ वर्ष पूर्ण, माधुरीचा 'एक दो तीन'वर पुन्हा जलवा
अजयने आजवर अॅक्शन, मनोरंजन, थ्रिलर, सस्पेन्स, ऐतिहासिक अशा विविध चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या चित्रपटांना चाहत्यांची विशेष पसंतीही मिळते. यावेळी तो पडद्यावर 'तान्हाजी'च्या रुपात अवतरणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. आता या चित्रपटाचं नवं पोस्टर शेअर करून अजयच्या १०० चित्रपटातील झलक या पोस्टरवर दाखवण्यात आली आहे.