महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'वॉर' चित्रपटाची विदेशातही क्रेझ, हृतिकच्या 'या' चित्रपटांचा मोडला रेकॉर्ड

'वॉर' चित्रपटातील दमदार अ‌ॅक्शन आणि सस्पेन्स प्रेक्षकांना सिनेमागृहाकडे आकर्षित करण्यात उपयुक्त ठरला आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने बरेच विक्रम मोडले आहेत.

'वॉर' चित्रपटाची विदेशातही क्रेझ, हृतिकच्या 'या' चित्रपटांचा मोडला रेकॉर्ड

By

Published : Oct 14, 2019, 9:39 AM IST

Updated : Oct 14, 2019, 11:53 AM IST

मुंबई - बॉक्स ऑफिसवर सध्या 'वॉर' चित्रपट एकापाठोपाठ एक विक्रम रचत आहे. पहिल्याच दिवशी ५० कोटी पार केलेल्या या चित्रपटानं अवघ्या ७ दिवसात २०० कोटीची कमाई केली. हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या करिअरमधला आत्तापर्यंतचा हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. भारतातच नाही, तर विदेशातही या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. दक्षिण अमेरिकेत हा चित्रपट सर्वाधिक जास्त कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे.

हेही वाचा -'तुफान' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान फरहान अख्तर जखमी

'वॉर' चित्रपटातील दमदार अ‌ॅक्शन आणि सस्पेन्स प्रेक्षकांना सिनेमागृहाकडे आकर्षित करण्यात उपयुक्त ठरला आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने बरेच विक्रम मोडले आहेत. 'उरी - द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटाच्या संपूर्ण कमाईचा रेकॉर्ड मोडत 'वॉर'ची ३०० कोटीकडे वाटचाल सुरू झाली आहे.

आत्तापर्यंत या चित्रपटाने २५० कोटीचा व्यवसाय केला आहे. तर, तेलुगू आणि तमिळ भाषेतील व्यवसाय मिळून २५७ कोटींचा गल्ला जमवला आहे.

हेही वाचा -'सारेगमप लिटील चॅम्प'चे नशेमुळं उद्ध्वस्त झालं होतं करिअर, इंडियन आयडॉलमधून करणार नवी सुरुवात

दक्षिण अमेरिकेमध्ये या चित्रपटाने आत्तापर्यं ३.२ मिलियनची कमाई केली आहे. तसेच, हृतिकच्या 'जिंदगी ना मिलेगी दोबारा', 'बँग बँग', 'सुपर ३०', 'जोधा अकबर', 'क्रिश ३', 'अग्नीपथ' आणि इतरही बऱ्याच चित्रपटाने 'वॉर'ला मागे टाकलं आहे.

हेही वाचा -तान्हुल्याच्या भेटीची ओढ लागलेल्या आईची कथा, पाहा 'हिरकणी'चा ट्रेलर

Last Updated : Oct 14, 2019, 11:53 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details