महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

टायगर आणि हृतिकची जुगलबंदी असलेलं 'वॉर'चं पहिलं गाणं प्रदर्शित - war film trailer

'जय जय शिवशंकर', असे या गाण्याचे बोल आहेत. होळीच्या पार्श्वभूमीवर आधारित हे गाणं आहे. हृतिक आणि टायगर दोघांची जुगलबंदी या गाण्यात पाहायला मिळते.

टायगर आणि हृतिकची जुगलबंदी असलेलं 'वॉर'चं पहिलं गाणं प्रदर्शित

By

Published : Sep 21, 2019, 12:57 PM IST

मुंबई - अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा 'वॉर' चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. चित्रपटाच्या ट्रेलरपासून चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता आहे. हृतिक आणि टायगर दोघांची जुगलबंदी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्येही दोघांची दमदार झलक पाहायला मिळाली. आता या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

'जय जय शिवशंकर', असे या गाण्याचे बोल आहेत. होळीच्या पार्श्वभूमीवर आधारित हे गाणं आहे. विशाल दादलानी आणि बेनी डेयल यांनी हे गाणं गायलं आहे. तर, विशाल-शेखर यांच्या जोडीचं संगीत हे प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडणारं आहे. कुमार यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.

हेही वाचा -Public Review: प्रेक्षकांवर झोया - दुलकरच्या जोडीची भूरळ, 'झोया फॅक्टर'बद्दल दिल्या प्रतिक्रिया

टायगर आणि हृतिकचा डान्स हे या गाण्याचं मुख्य आकर्षण आहे. दोघांनाही एकत्र डान्स करताना पाहण्याची संधी या गाण्यातून चाहत्यांना मिळाली आहे. या गाण्यात तब्बल ५०० डान्सर्सचा समावेश आहे. टायगर आणि हृतिकने जवळपास ३ आठवडे या गाण्याची तयारी केली आहे.

'वॉर' चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. या चित्रपटा टायगर आणि हृतिकसोबत अभिनेत्री वाणी कपूर ही देखील झळकणार आहे. २ ऑक्टोंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा -गोष्ट वायरलेस प्रेमाची, अंकुश चौधरीच्या 'ट्रीपल सीट'चा टीजर प्रदर्शित

ABOUT THE AUTHOR

...view details