महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'वक्‍त ही तो है, गुजर जाएगा' म्हणत अमिताभसह ६० सेलेब्सनी गायिले नवीन प्रेरणादायी गीत - Big B and over 60 celebs in motivational song

अमिताभ बच्चन यांच्यासह साठ कलाकारांनी गुजर जायेगा या गाण्याच्या व्हिडिओमध्ये सहभाग घेतला आहे. या कठिण प्रसंगी लोकांच्या मनात सकारात्मकता आणण्यासाठी या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे.

Big B and over 60 celebs in new motivational song
अमिताभसह ६० सेलेब्सनी गायिले नवीन प्रेरणादायी गीत

By

Published : May 11, 2020, 5:19 PM IST

मुंबई - कोरोना व्हायरसच्या संकटाच्या काळात सकारात्मकता पसरवण्यासाठी 'गुजर जायेगा' या गीता व्हिडिओ प्रसिध्द झाला आहे. यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील साठ सेलेब्रिटींचा समावेत या व्हिडिओत आहे. यात अमिताभ बच्चनपासून ते सनी लिओनी, सानिया मिर्झा ते लिअँडर पेस, महेश भूपती आणि भाइयुंग भुतीयापासून ते विजेंद्र सिंग या सेलेब्रिटींचा समावेश आहे.

सुशील कुमार, दीपा मलिक, अंजुम चोप्रा, कपिल शर्मा आणि मनोज बाजपेयी हे गायक सोनू निगम, श्रेया घोषाल, अनन्या बिर्ला, कैलाश खेर, शान, जावेद अली, ज्योती नूरान, अखिल सचदेवा, हंसराज हंस, बाबुल यांचाही व्हिडिओमध्ये समावेश आहेत. शिवाय सुप्रियो, रिचा शर्मा आणि विपिन अनेजा. हेदेखील झळकले आहेत.

या गाण्याच्या ट्रॅकची संकल्पना वरुण प्रभुदयाल गुप्ता आणि जय वर्मा यांची आहे. याला जझिम शर्मा यांनी संगीत दिले आहे, तर गीत सिद्धांत कौशल यांनी लिहिले आहे.

अमिताभ बच्चन यांनी या गाण्याचे निवेदन केले आहे. या सुंदर गाण्याचा हिस्सा झाल्याबद्दल श्रेया हिने आभार व्यक्त केले आहेत. संकटाच्या या प्रसंगी एकीने पुढे जाऊयात असे सनी लिओनीने म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details