महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

वयाच्या ८१ व्या वर्षीही 'या' दिग्गज अभिनेत्रीला करायचंय स्कुबा डायव्हिंग - वहिदा रेहमान

कितीही वय झालं, तरीही काम करण्याची जिद्द आणि मेहनत घेण्याची तयारी काही बॉलिवूड कलाकारांची असते. ट्विंकल खन्नासोबतच्या एका मुलाखतीत या अभिनेत्रीनं आपली ही इच्छा बोलून दाखवली.

वयाच्या ८१ व्या वर्षीही 'या' दिग्गज अभिनेत्रीला करायचंय स्कुबा डायव्हिंग

By

Published : Sep 24, 2019, 10:46 AM IST

मुंबई - 'वय हा केवळ एक आकडा असतो' ही उक्ती बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकारांकडे पाहून खरी ठरते. कितीही वय झालं, तरीही काम करण्याची जिद्द आणि मेहनत घेण्याची तयारी या कलाकारांची असते. बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयानं वर्षानुवर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांचं नाव घेतलं जात. आपल्या सौंदर्यासोबतच आपल्या अभिनयानं त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. सध्या त्यांचे वय ८१ असले, तरीही बॉलिवूडच्या इतर कलाकारांसाठी आजही त्या प्रेरणा आहेत. अलिकडेच त्यांनी स्कुबा डायव्हिंग करण्याची इच्छा असल्याचं बोलून दाखवलं आहे.

अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिच्यासोबत एका मुलाखतीदरम्यान वहिदा रहमान यांनी त्यांची ही इच्छा बोलून दाखवली आहे. ट्विंकलने त्यांना त्यांच्या इच्छेबद्दल प्रश्न विचारला होता. यावर लगेच वहिदा यांनी स्कुबा डायव्हिंग करण्याची इच्छा असल्याचं सांगितलं. त्यांचं उत्तर ऐकुन ट्विंकललाही आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, वहिदा यांच्या चिकाटीचं तिलाही कौतुक वाटलं.

हेही वाचा -'पिकासो' चित्रपटातून दिसणार कोकणातील दशावतारी कलावंताची कथा, फर्स्ट लूक प्रदर्शित

तिने त्यांच्यासोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

वहिदा रहमान
वहिदा रहमान

हेही वाचा -अंकित बॅक इन अ‌ॅक्शन, 'फत्तेशिकस्त'मध्ये साकारणार 'येसाजी कंक'

ABOUT THE AUTHOR

...view details