महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

ज्येष्ठ अभिनेते रमेश मेढेकर यांचं पुण्यात दीर्घ आजाराने निधन - medhekar

जब्बार पटेल यांच्या सिंहासन, सामना अश्या चित्रपटातून त्यांनी चरित्र अभिनेता म्हणून छोट्या भूमिका केल्या. गेली काही वर्षे त्यांनी इंडियन मॅजिक आय या संस्थेतून अनेक दूरदर्शन मालिकांमधूनही काम केली.

रमेश मेढेकर

By

Published : May 31, 2019, 3:56 AM IST

पुणे - ज्येष्ठ नट रमेश मेढेकर यांचे काल दुपारी ४.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. गेली जवळ जवळ ५५ वर्षे ते रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका या क्षेत्रात कार्यरत होते. त्यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

पुण्यातील थिएटर अकादमी या संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते. गुरुवर्य भालबा केळकर यांच्या प्रोग्रेसिव्ह ड्रामाटीक असोसिएशन पासून त्यांच्या रंगमंचीय कार्यकीर्दीला सुरुवात झाली. पीडीएमध्ये त्यांनी तू वेडा कुंभार, देवांचे मनोराज्य, देव चालले, अश्या नाटककांमधून विविध भूमिका केल्या. 1973 मध्ये थिएटर अकादमी, पुणेची स्थापना झाल्यावर त्यांनी घाशीराम कोतवाल, महानिर्वाण, तीन पैशाचा तमाशा, बेगम बर्वे अश्या नाटकातून भूमिका केल्या. जब्बार पटेल यांच्या सिंहासन, सामना अश्या चित्रपटातून त्यांनी चरित्र अभिनेता म्हणून छोट्या भूमिका केल्या. गेली काही वर्षे त्यांनी इंडियन मॅजिक आय या संस्थेतून अनेक दूरदर्शन मालिकांमधूनही काम केली.

सध्या 'सोनी मराठी'वर त्यांची ‘ती फुलराणी’ नावाची मालिका सुरू आहे. या मालिकेत एक महत्त्वाची भूमिका ते करत होते. मात्र गेले काही दिवस प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांचे शालेय शिक्षण नुमविमधून झाले होते. इंजिनियर झाल्यावर ते पुणे महानगर पालिकेमध्ये अभियंता पदावर अनेक वर्षे नोकरी करत होते. त्यांच्या जाण्याने एक सच्चा रंगकर्मी आपल्यातून निघून गेल्याची भावना व्यक्त होतेय.

ABOUT THE AUTHOR

...view details