महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी चिरंजीवीसोबत पाहिला 'सैरा' - Chiranjeevi in Sye Ra narsimha reddy

चिरंजीवी यांच्या भूमिकेची प्रशंसा करत त्यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाचीही प्रशंसा केली. अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेचंही त्यांनी कौतुक केलं.

उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी चिरंजीवीसोबत पाहिला 'सैरा'

By

Published : Oct 17, 2019, 11:54 AM IST

हैदराबाद - दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांचा काही दिवसांपूर्वीच 'सैरा-नरसिम्हा रेड्डी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांचीही भूमिका पाहायला मिळाली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला आहे. प्रेक्षकांनीही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी अलिकडेच चिरंजीवी यांच्यासोबत हा चित्रपट पाहिला. तसेच, त्यांनी या चित्रपटातील सर्व कलाकारांचं कौतुकही केलं.

चिरंजीवी यांच्या भूमिकेची प्रशंसा करत त्यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाचीही प्रशंसा केली. अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेचंही त्यांनी कौतुक केलं.

आंध्र प्रदेश येथील शूरवीर 'उय्यालवाडा नरसिम्हा रेड्डी' यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

हेही वाचा -'भूतराजा' बनून नवाजुद्दीनने केले अक्षयला बेहाल, पाहा 'हाऊसफुल ४'चं धमाल गाणं

बऱ्याच दिवसांनंतर एक चांगला आणि प्रेरणादायी चित्रपट पाहिला, असे वेंकय्या नायडू म्हणाले. 'एन. टी. रामाराव' आणि अक्कीनेनी नागेश्वर यांच्यानंतर चिरंजीवी हे सुपरस्टार असल्याचं ते म्हणाले.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनीही त्यांच्या पत्नीसोबत चिरंजीवी यांच्या घरी हजेरी लावली होती.'सैरा-नरसिम्हा रेड्डी' हा हिंदीसह तेलुगू, तामिळ या भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत २०० कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे.

हेही वाचा -'हाउसफुल 4 एक्सप्रेस'मधून प्रवास करतानाचा अक्षय, रितेशचा धमाल व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details