महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

ऐश्वर्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघाच्या अपयशावर विवेकचे ट्विट, युजर्स म्हणतात, मॅच्युअर हो, नाहीतर... - india

१२ जुलै रोजी भारत विरुद्ध न्युझीलंड सामन्याचा उर्वरीत खेळ हा १३ जुलैला रंगला होता. मात्र, या सामन्यात भारताला पराभव पत्कारावा लागला. या पराभवानंतर क्रिकेटप्रेमींकडुन संमिश्र प्रतिक्रिया उमटत होत्या. मात्र, विवेकने या अपयशावर त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक मिम शेअर केले आहे.

ऐश्वर्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघाच्या अपयशावर विवेक ओबेरॉयचे ट्विट, युजर्स म्हणतात, 'मॅच्युअर हो, नाहीतर...'

By

Published : Jul 12, 2019, 9:46 PM IST

मुंबई -बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय मध्यंतरी 'पीएम नरेंद्र मोदी' यांच्या बायोपिकमुळे प्रकाशझोतात आला होता. यादरम्यान निवडणुका सुरू असताना विवेकने ऐश्वर्या राय बच्चन संबधी एक वादग्रस्त ट्विट केले होते. तेव्हा त्याच्यावर प्रचंड टीका झाली होती. आता पुन्हा एकदा अशाच एका ट्विटमुळे तो सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

१२ जुलै रोजी भारत विरुद्ध न्युझीलंड सामन्याचा उर्वरीत खेळ हा १३ जुलैला रंगला होता. मात्र, या सामन्यात भारताला पराभव पत्कारावा लागला. या पराभवानंतर क्रिकेटप्रेमींकडुन संमिश्र प्रतिक्रिया उमटत होत्या. मात्र, विवेकने या अपयशावर त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक मिम शेअर केले आहे. यामुळे सोशल मीडिया युजर्सनी त्याला धारेवर धरले आहे.

'मिस्टर ओबेरॉय मॅच्युअर व्हा नाहीतर लोक नेहमी तुमच्याकडे लक्ष देणार नाहीत', असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

ऐश्वर्या राय बच्चनसंबधी देखील शेअर केले होते मिम

निवडणुकांमधील एक्झिट पोल, ओपेनियन पोल आणि रिझल्टसंबधात विवेकने ऐश्वर्या रायसंबधी एक मिम शेअर केले होते. या मिममध्ये ऐश्वर्या राय-सलमान खान, ऐश्वर्या-अभिषेक, आणि ऐश्वर्या-अभिषेक आणि आराध्या, असे चित्र जोडले गेले होते. या मिमवरुन त्याला बरेच ट्रोल करण्यात आले होते. शेवटी त्याने हे मिम डिलीट करुन चाहत्यांची माफी मागितली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details