मुंबई -अभिनेता विवेक ओबेरॉयने मोठ्या जल्लोषात गणरायाचे स्वागत केले होते. आता ५ दिवसानंतर मोठ्या भक्तीभावाने त्याने लाडक्या गणरायाला निरोप दिला. गणरायाची पुजाअर्चना झाल्यानंतर आपल्या कुटुंबियासोबत त्याने गणेश विसर्जन केले.
विवेकच्या घरी ५ दिवसांच्या गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. ५ दिवस मोठ्या उत्साहाने विवेक आणि त्याच्या कुटुंबीयांनी गणरायाचं अगत्य केलं.