मुंबई -बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचे नाते जगापासून काही लपलेले नाही. एकेकाळी सलमान खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या आणि विवेकच्या नात्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यांचे नाते फारकाळ टिकले नाही. पुढे ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबत लग्न केले. सध्या देशभरात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. अशातच एक्झिट पोलचे अंदाजही वर्तवण्यात येत आहेत. यावरूनच विवेकने ऐश्वर्यासोबतचा असलेला एक मीम सोशल मीडियावर शेअर केला आहे.
निवडणुकीच्या माहोलमध्ये विवेकने साधला ऐश्वर्यावर निशाणा, शेअर केला 'हा' फोटो - social media
विवेकने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. यामध्ये ऐश्वर्या सलमान खान, विवेक आणि अभिषेकसोबत दिसत आहे. ऐश्वर्याच्या वैयक्तिक आयुष्यावर हा मीम आहे
विवेकने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. यामध्ये ऐश्वर्या सलमान खान, विवेक आणि अभिषेकसोबत दिसत आहे. ऐश्वर्याच्या वैयक्तिक आयुष्यावर हा मीम आहे. यामध्ये ऐश्वर्या-सलमानला ओपिनियन पोल, ऐश्वर्या-विवेकला ऐक्झिट पोल आणि ऐश्वर्या-अभिषेक यांच्या जोडीला रिझल्ट दाखवण्यात आला आहे. हा फोटो शेअर करून विवेकने यावर कॅप्शनही दिले आहे. 'क्रिएटिव्ह, इथे कोणतेच राजकारण नाही, हेच आयुष्य आहे', असे त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
विवेकच्या या ट्विटवरून काही युजर्स हे त्याला ट्रोल करत आहेत. तर काहींनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने तर म्हटले आहे, 'अभिषेकचे माहित नाही, मात्र, हा टोला सलमानला नक्की लागेल'.
विवेक सध्या 'पी. एम. मोदी' या बायोपिकमुळे चर्चेत आहे. निवडणुकीच्या काळामध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला नाही. मात्र, २३ मे ला निर्णय जाहीर झाल्यानंतर २४ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.