दुबई- टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली या दिवसांत बर्यापैकी आनंदात आहे. पहिली गोष्ट म्हणजे, त्याचा आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सध्याच्या हंगामात चांगली कामगिरी करत आहे आणि दुसरे म्हणजे तो वडील होणार आहे. सध्या त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा संयुक्त अरब अमिरातीमध्ये त्याच्याबरोबर आहे.
रविवारी इंस्टाग्रामवर कोहलीने अनुष्कासोबत स्वत:चा एक फोटो शेअर केलेा होता. हा फोटो आरसीबीचा सहकारी क्रिकेटर एबी डिव्हिलियर्सने काढला आहे. फोटोत स्टार जोडपे समुद्रात मावळत्या सुर्याच्या सुंदर पार्श्वभूमीवर एकमेकांच्या डोळ्यात पाहताना दिसत आहे. कोहलीने फोटोच्या कॅप्शनमध्ये सूर्यास्त इमोजी शेअर केला आहे.