मुंबई -कला आणि क्रिकेट अशा दोन्हीही क्षेत्रातील लोकप्रिय जोडी म्हणून विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना ओळखले जाते. काल (१ मे) अनुष्काचा ३० वा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसानिमित्त दोघांनीही ऐकमेकांसोबत एका निवांत ठिकाणी वेळ घालवला. विराटने त्यांचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
अनुष्काच्या वाढदिवशी विराटचे खास सरप्राईझ, पाहा फोटो - virushka
क्रिकेट विश्वात असलेली विराटची लोकप्रियता आणि अभिनयात अव्वल असलेली अनुष्का यांची ही जोडी नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. अनुष्काच्या वाढदिवशीही विराटने अनुष्काला दिलेले सरप्राईझ पाहून चाहत्यांनीही त्या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.
विराट आणि अनुष्का दोघांची केमेस्ट्री चाहत्यांना फारच आवडते. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. विराट आणि अनुष्का दोघेही एका जाहीरातीच्या निमित्ताने एकमेकांना भेटले होते. त्यानंतर त्यांची मैत्री आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. ११ डिसेंबर २०१७ साली दोघांनीही इटली येथे शाही थाटात लग्नगाठ बांधली.