मुंबई- 'जब तक है जान' या गाण्याच्या आयकॉनिक शोले सीक्वेन्सची पुनरावृत्ती करणार्या इराणी महिलेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हेमा मालिनीने शोलेमध्ये बसंती बनून डाकूंच्या समोर केलेल्या नृत्याचे रिक्रियशन यात केलेले दिसते. उपस्थित लोकांनी बसंतीला प्रोत्साहन दिल्याचे व्हिडिओत दिसते.
या गाण्यात नृत्य करणाऱ्या महिलेचे नाव कळू शकलेले नाही. पण हेमा मालिनीने सादर केलेल्या नृत्याच्या स्टेप्स ती उत्तमरित्या वापरताना दिसते. धर्मेंद्रला ज्या पध्दतीने बांधलेले असते तसेच एका व्यक्तीला यात बांधलेले आहे आणि अमजद खानची व्यक्तीरेखाही एकजण साकारताना दिसतोय.