मुंबई -मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला 'एबी आणि सीडी' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. आता या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.
या टीझरमध्ये विक्रम गोखले आपल्या वृद्धत्वानंतर येणाऱ्या अनुभवांविषयी बोलताना दिसतात. तर, अमिताभ बच्चन हे त्यांचे खास मित्र असल्याचा अंदाज टीझरवरुन येतो. त्यांची बऱ्याच वर्षानंतर भेट होणार असते. तसं पत्र देखील अमिताभ विक्रम यांना पाठवतात. मात्र, ऐनवेळी अमिताभ या कार्यक्रमात हजेरी लावू शकतील की नाही, याबद्दल उत्कंठा वाढली आहे.
हेही वाचा -'इंडियन आयडल ११'च्या सेटवर परिक्षकांना अश्रु अनावर, पाहा 'ग्रँड फिनाले'चा प्रोमो