हैदराबाद -तामिळ सुपस्टार विजय सेथुपती संतोश सिवन दिग्दर्शित 'मुंबईकर' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाचे पोस्टरही सोशल मीडियावर प्रसिध्द करण्यात आले आहे. आज नुकतेच विजयने चित्रपटातील पहिला लूक चाहत्यांसाठी शेयर केला आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोंबरमध्ये विजयचा 'का पै रनसिंगम' हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला होता. जानेवारीत त्याने 'मुंबईकर' चित्रपटाची घोषणा केली. हा चित्रपट २०२७ च्या 'मनगरम' या प्रसिध्द चित्रपटाचा हिंदी रिमेक असेल. सोमवारी विजयने इंस्टाग्रामवर मुंबईकर अशी कॅप्शन टाकत पहिला लूक शेयर केला. या चित्रपटात मुंबईकरांचे जीवन मांडण्यात येणार आहे.
हेही वाचा -गाण्याच्या रेकॉर्डिंगने करण्यात आला ‘लाव' चित्रपटाचा मुहूर्त!