हैदराबाद- दक्षिण सुपरस्टार विजय सेतुपती हळूहळू सीमौल्लंघन करीत भाषेचे अडथळे पार करीत चालला आहे. अलिकडेच रिलीज झालेल्या मास्टर या चित्रपटात त्याने खतरनाक खलनायक साकारला होता. दिग्दर्शक लोकेश कनागराज आणि विजय सेतुपतीने या व्यक्तीरेखेचा गौरव होणार नाही याची काळजी घेतली होती.
मास्टर चित्रपटामध्ये विजयने साकारलेला भवानी हा कायद्याच्या पळवाटा शोधणारा आणि अल्पवयीन मुलांवर जबरदस्तीने गुन्हे करणारा दाखवण्यात आलाय. एका टॅबलॉईडशी बोलताना विजयने खुलासा केला की, हे डार्क कॅरेक्टर काढून टाकणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते. ऑनस्क्रिन खलनायक दिसण्याच्या आपला अनुभव सांगताना विजय म्हणाला, "माझे दिग्दर्शक लोकेश कानगराज आणि मला माझे पात्र भवानी वाईट दिसू नये म्हणून खूप काळजी घ्यावी लागली. वाईट गोष्टीचा गौरव न करणे ही सिनेमाची जबाबदारी आहे."
''चांगले असो की वाईट हे आपल्यामध्येच असते. आपल्या व्यक्तिमत्त्वाची कोणती बाजू दाखवायची आहे हे आपल्यावर अवलंबून आहे. मी मुळात चांगला माणूस नाही, हे मी आत्मविश्वासाने सांगू शकत नाही. परंतु मला चांगला व्यक्ती बनायचे आहे,'' असे विजय पुढे म्हणाला.
चित्रपटात मुलांवर अत्याचार दाखवण्याच्या एका प्रसंगाने हादरुन गेलो होतो असा अनुभव विजयने सांगितला. तो म्हणाला, "मास्टरमध्ये दोन मुलांना ठार मारण्याच्या कल्पनेने मी खरोखरच चिंताग्रस्त झालो होतो. मला हिंसाचाराशिवाय प्रेक्षकांना त्रास देण्यासारखे काहीही करायचे नव्हते. दिग्दर्शक आणि माझी यावर यावर अनेकदा चर्चा झाली. मुलांची प्रत्यक्ष हत्या दाखवायची नाही असा निर्णय आम्ही घेतला. माणूस किती वाईट आहे हे आम्हाला दाखवायचे होते. "
विजय सेतुपती हा त्याच्या अष्टपैलु अभिनयामुळे ओळखला जातो. गेल्या वर्षी 'सुपर डिलक्स' हा त्याचा तामिळ चित्रपट ओटीटीवर तुफान चालला. बॉलिवूडमध्ये पदार्पणाची घोषणा त्याने वर्षाला सुरुवात केली. हा अभिनेता संतोष शिवनच्या 'मुंबईकर' या चित्रपटात काम करणार आहे. २०१७ मध्ये गाजलेल्या तामिळ हिट ‘मानगम’ या चित्रपटाचा 'मुंबईकर' हा हिंदी रिमेक असेल.