महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

विजय देवरकोंडाच्या चित्रपटाची करण जोहर करणार निर्मिती, शूटिंगला सुरुवात - Vijay Deverakonda's latest news

विजय देवरकोंडाने 'गीता - गोविंदम', 'अर्जुन रेड्डी' आणि 'डियर कॉम्रेड' यांसारख्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या या चित्रपटातील भूमिकांमुळे त्याची लोकप्रियता देखील वाढली आहे.

Vijay Deverakonda's upcoming film, Vijay Deverakonda's fighter film, karan johar present Vijay Deverakonda's upcoming film, Vijay Deverakonda's latest news, Vijay Deverakonda in Fighter film
विजय देवरकोंडाच्या चित्रपटाची करण जोहर करणार निर्मिती, शूटिंगला सुरुवात

By

Published : Jan 20, 2020, 5:27 PM IST

मुंबई -दाक्षिणात्य सिनेसृष्टीतला लोकप्रिय आघाडीचा अभिनेता विजय देवरकोंडाने आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. 'फायटर' असे या चित्रपटाचे नाव आहे. पुरी जग्गनाध हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर, करण जोहर, अपूर्वा मेहता यांच्या धर्मा प्रोडक्शनअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे.

विजय देवरकोंडाने 'गीता - गोविंदम', 'अर्जुन रेड्डी' आणि 'डियर कॉम्रेड' यांसारख्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या या चित्रपटातील भूमिकांमुळे त्याची लोकप्रियता देखील वाढली आहे. आता 'फायटर' चित्रपटात तो अ‌ॅक्शन अवतारात दिसणार आहे.

विजय देवरकोंडाच्या 'फायटर' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात

हेही वाचा -'कभी खुशी कभी गम' चित्रपटाबद्दल करण जोहरचा धक्कादायक खुलासा, वाचा

हा चित्रपट हिंदी भाषेसह सर्व दाक्षिणात्य भाषांमध्ये झळकणार आहे. रोनीत रॉय आणि राम्या क्रिष्नन यांचीही महत्वपूर्ण भूमिका राहणार आहे.

पुरी जगन्नाध यांनी यापूर्वी दिग्दर्शक राम गोपाल वर्मासोबत 'पोक्किरी' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यानंतर 'बिझनेसमॅन', 'टेंपर' यांसारखे चित्रपटही त्यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झाले आहे. हिंदीमध्ये 'बुढ्ढा होगा तेरा बाप' या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. अलिकडेच 'आय स्मार्ट शंकर' या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.

विजय देवरकोंडाचा तेलुगू 'वर्ल्ड फेमस लव्हर' हा चित्रपटही सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. व्हॅलेंटाईन डे म्हणजे १४ फेब्रुवारीला त्याचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -दिशाने शेअर केला 'मलंग' चित्रपटातील घायाळ करणारा लुक

ABOUT THE AUTHOR

...view details