'जंगली'नंतर विद्युत जामवाल साकारणार रोमॅन्टिक चित्रपट - romantic-action thriller film
एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाची कथा असेल. या चित्रपटात अॅक्शन सीनदेखील असणार आहेत.
मुंबई - 'कमांडो' फेम विद्युत जामवालचा अलिकडेच 'जंगली' चित्रपट प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला सरासरी यश मिळाले आहे. आता विद्युतची रोमॅन्टिक चित्रपटासाठी वर्णी लागली आहे. दिग्दर्शक फारुख कबीर यांच्या आगामी 'खुदाहाफीज' या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
'खुदाहाफीज' या चित्रपटाची अलिकडेच घोषणा करण्यात आली होती. फारुख कबीर यांनी यापूर्वी नसीरुद्दीन शाह आणि शर्मन जोशी यांची भूमिका असलेल्या 'अल्लाह के बंदे' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाची कथा असेल. या चित्रपटात अॅक्शन सीनदेखील असणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील टीम या अॅक्शन सीन्सला कोरियोग्राफ करतील. चित्रपटात विद्युतसोबत कोणती अभिनेत्री झळकणार, याबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.