महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

विद्या बालन अभिनित ‘शेरनी’ चे नवीन पोस्टर झाले अनावरीत! - शेरनी

'न्यूटन' फेम अमित मसुरकर दिग्दर्शित विद्या बालनच्या आगामी ‘शेरनी’ या चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर करुन निर्मात्यांनी आज या चित्रपटाच्या उत्साहाला उत्तेजन दिले आहे. या पोस्टरमध्ये विद्या बालन फॉरेस्ट ऑफिसरच्या वेशात दिसत असून आपल्या सहकाऱ्यांसह जंगलाची पाहणी करताना दिसत आहे. विद्या आपल्या अष्टपैलू अभिनयाने प्रत्येक पात्र जीवन करते, आपल्या अभिनयातून तिच्या प्रत्येक पात्रात जीव ओतते हे तर जगजाहीर आहे आणि आता तिच्या या ‘कडक’ लुकमुळेही प्रेक्षकांच्या चित्रपटाप्रती अपेक्षा उंचावल्या आहेत.

शेरनी,  vidya balan, sherni
शेरनी

By

Published : Jun 8, 2021, 8:17 AM IST

मुंबई- ‘शेरनी’ च्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत चालली आहे. चित्रपटाच्या धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आता निर्मात्यांनी ‘शेरनी’चे नवीन पोस्टर अनावरीत केले आहे. ‘शेरनी’ आधीपासूनच चर्चेत आहे आणि त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून तो अधिकच चर्चेत आहे आणि प्रेक्षक आकर्षित होताना दिसून येत आहेत. या चित्रपटात विद्या बालन वन अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. वास्तविक जीवनातील महिला वन अधिकाऱ्यांनाही या चित्रपटाचा ट्रेलर भावला असून त्यांनी समाज माध्यमांवर आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. या सिनेमात शरद सक्सेना, मुकुल चड्ढा, विजय राझ, इला अरूण, ब्रिजेंद्र काला आणि नीरज काबी यांच्याहे महत्वपूर्ण भूमिका आहेत.

'न्यूटन' फेम अमित मसुरकर दिग्दर्शित विद्या बालनच्या आगामी ‘शेरनी’ या चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर करुन निर्मात्यांनी आज या चित्रपटाच्या उत्साहाला उत्तेजन दिले आहे. या पोस्टरमध्ये विद्या बालन फॉरेस्ट ऑफिसरच्या वेशात दिसत असून आपल्या सहकाऱ्यांसह जंगलाची पाहणी करताना दिसत आहे. विद्या आपल्या अष्टपैलू अभिनयाने प्रत्येक पात्र जीवन करते, आपल्या अभिनयातून तिच्या प्रत्येक पात्रात जीव ओतते हे तर जगजाहीर आहे आणि आता तिच्या या ‘कडक’ लुकमुळेही प्रेक्षकांच्या चित्रपटाप्रती अपेक्षा उंचावल्या आहेत.

टी-सीरिज आणि अबंडनशीया एंटरटेनमेंट, भूषण कुमार, कृष्ण कुमार, विक्रम मल्होत्रा ​​आणि अमित मसूरकर निर्मित आणि भारताची ‘ऑस्कर’ साठी अधिकृत एंट्री असलेला चित्रपट ‘न्यूटन’ चे दिग्दर्शन केलेल्या अमित मसुरकर ने ‘शेरनी’ ने दिग्दर्शन केले आहे. गंभीर विषयाला हलक्याफुलक्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडण्याची त्याची हातोटी असल्यामुळे ‘शेरनी’ सुद्धा प्रेक्षकांचे मनोरंजन करत प्रबोधन करेल यात शंका नाही.

विद्या बालन अभिनित बहुप्रतिक्षित चित्रपट ‘शेरनी’ १८ जून २०२१ रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details