महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये विद्या बालनच्या 'नटखट' आणि मराठी 'हबड्डी'चा समावेश - Natkhast by Vidya Balan

विद्या बालनची निर्मिती असलेल्या नटखट या चित्रपटासह मराठी चित्रपट हबड्डी मेलबर्न येथे होणाऱ्या भारतीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहे. २३ ते ३० ऑक्टोबर दरम्यान हा फेस्टिव्हल आयोजित केला जाईल.

Melbourne Film Festival
मेलबर्न फिल्म फेस्टिव्हल

By

Published : Oct 15, 2020, 4:22 PM IST

नवी दिल्ली- विद्या बालन निर्मित चित्रपट 'नटखट' आणि मराठी चित्रपट 'हबड्डी' 23 ऑक्टोबरला मेलबर्नच्या भारतीय चित्रपट महोत्सवात सहभागी होणार आहेत. कोरोना साथीच्या धोक्यामुळे, फेस्टिव्हल २३ ते ३० ऑक्टोबर दरम्यान आयोजित केला जाईल. फेस्टमध्ये 'नटखट' ओपनिंग फिल्म असेल. या चित्रपटात आई आपल्या वयात आलेल्या मुलाला लैंगिक समानतेची शिकवण देताना दाखवण्यात आली आहे.

नचिकेत सामंताच्या 'हबड्डी' या मराठी चित्रपटासह एक डबल धमाका पॅकेजमध्ये रिलीज होईल.

दरवर्षीप्रमाणे, फेस्टव्हलमध्ये 17 भाषांमध्ये 60हून अधिक चित्रपटांचे प्रदर्शन केले जाईल.

फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित होणारे चित्रपट अधिकृत वेबसाईटवर मोफत स्ट्रीमिंग होणार आहेत.

फेस्टचे दिग्दर्शक मितू भौमिक लांगे म्हणाले की, “हा असामान्य काळ आहे जिथे जग पूर्वीपेक्षा जास्त अडचणींमधून जात आहे. सिनेमा म्हणजे लोकांची आधार व्यवस्था आहे आणि अंधाऱ्या काळापासून त्यांना विराम देते. आईएफएफएम जगभरातील चित्रपट शौकिनांच्या मनोरंजनासाठी समर्पित आहे आणि आम्हाला आशा आहे की यामुळे जखम भरुन येईल."

ABOUT THE AUTHOR

...view details