महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

विद्या बालनच्या 'शकुंतला देवी'चा नवा टीझर प्रदर्शित - new teaser of Shakuntala Devi

जागतिक गणित दिवसानिमित्त शकुंतला देवीला हा टीझर समर्पित करण्यात आला आहे. 'गणित अगदी सोप्या पद्धतीने शिकवणारी स्त्री', अशा ओळी या टीझरमध्ये पाहायला मिळतात.

विद्या बालनच्या 'शकुंतला देवी'चा नवा टीझर प्रदर्शित

By

Published : Oct 15, 2019, 3:50 PM IST

Updated : Oct 15, 2019, 4:03 PM IST

मुंबई - 'ह्युमन कॉम्प्युटर', अशी ओळख असणाऱ्या शकुंतला देवींची कथा आता मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. विद्या बालन या सिनेमात शकुंतला देवींची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवातही झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला होता. आता विद्या बालनने या चित्रपटाचा आणखी एक टीझर शेअर केला आहे.

जागतिक गणित दिवसानिमित्त शकुंतला देवीला हा टीझर समर्पित करण्यात आला आहे. 'गणित अगदी सोप्या पद्धतीने शिकवणारी स्त्री', अशा ओळी या टीझरमध्ये पाहायला मिळतात. अवघड असलेले गणित अगदी बोटावर सोडवण्यात शकुंतला देवींचा हातखंडा होता. त्यामुळे त्यांना ह्युमन कॉम्प्युटर अशी ओळख मिळाली होती.

अनु मेनन हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.

पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये 'दंगल' फेम अभिनेत्री सान्या मल्होत्रा देखील भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील तिचाही लूक शेअर करण्यात आला आहे. सध्या लंडनमध्ये या चित्रपटाची शूटिंग सुरू आहे.

हेही वाचा -'बिग बीं'पेक्षा मोठी आहे शाहरुखची फॅन फोलोविंग, किंग खानने 'असे' मानले आभार

कोण आहेत शकुंतला देवी -
शकुंतला देवींनी आपली बुद्धीमत्ता आणि गणितीय कौशल्याचे वेगवेगळे चमत्कार दाखवून संपूर्ण जगाला चक्रावून सोडले.१८ जून १९८० मध्ये त्यांना दोन संख्या गुणाकारासाठी देण्यात आल्या. हे आकडे लंडनच्या इम्पिरियल कॉलेजच्या संगणक विभागाने निवडले होते. त्यांनी या दोन आकड्यांचा अचूक गुणाकार करून दाखवत केवळ २८ सेकंदांमध्ये हे उत्तर दिलं. यामुळेच ह्युमन कॉम्प्युटर, अशी त्यांची ओळख निर्माण झाली.

हेही वाचा -आलिया - रणबीरच्या नात्यावर काय म्हणाली करिना?

Last Updated : Oct 15, 2019, 4:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details