मुंबई -अभिनेता विकी कौशलच्या 'भूत' चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लुक आणि पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांना ट्रेलरची उत्सुकता आहे. त्यापूर्वी या चित्रपटाचा हॉरर टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये विकी कौशलची झलक पाहायला मिळते.
अंधाऱ्या खोलीत रक्ताने माखलेल्या हातांमध्ये विकी कौशल फसतो, असे या टीझरमध्ये पाहायला मिळते. अतिशय भयावह झलक असलेला हा टीझर आहे. या चित्रपटाचा ट्रेलर ३ तारखेला प्रदर्शित होणार आहे.