नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या भ्याड हल्ल्यात ४३ भारतीय जवानांना वीरमरण आले. जगभरातून या भ्याड हल्ल्याचा निषेध केला जात आहे. बॉलिवूडमधूनही या हल्ल्याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटाचा हिरो विकी कौशल याच्या एका फोटोने चाहत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.
पुलवामा हल्ल्यानंतरही विकी कौशलचा सोशल मीडियावर हसरा फोटो - विकी कौशल
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या भ्याड हल्ल्यात ४३ भारतीय जवानांना वीरमरण आले. जगभरातून या भ्याड हल्ल्याचा निषेध केला जात आहे. बॉलिवूडमधूनही या हल्ल्याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून विकी कौशलने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर ट्विटही केले आहे. वीरजवानांना आदरांजली वाहून त्याने त्यांच्या कुटुंबीयांसाठी प्रार्थनाही केली आहे.
'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटातून विकी कौशलच्या दमदार अभिनयाची झलक दिसली. या चित्रपटात 'उरी' येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी जे सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले होते, त्याचा थरार प्रेक्षकांना पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, देशभरात विकीच्या 'How is the josh' या डायलॉगने चाहत्यांमध्ये उत्साह भरला.
काही दिवसांपूर्वी त्याच्या 'उरी' चित्रपटाला मिळालेल्या चाहत्यांच्या प्रतिसादामुळे त्याने एक ट्विट केले होते. यात त्याने म्हटले होते, की 'How is the josh' हा फक्त एक डायलॉग नाही, तर ती प्रत्येक भारतीयाची भावना आहे. चाहत्यांनी दिलेल्या प्रेमामुळे त्याने सर्वांचे आभारही या ट्विटद्वारे मानले होते. या ट्विटसोबतच त्याने एक फोटोही शेअर केला होता. मात्र, गुरुवारी झालेल्या हल्ल्यानंतर त्याने त्याचे हे ट्विट 'पिन टू टॉप' म्हणजे सर्वात आधी दिसावे, असे घेतले आहे.