मुंबई - बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे विकी कौशल. 'मसान', 'संजू', 'राझी' आणि 'उरी - द सर्जिकल स्ट्राईक' यांसारख्या चित्रपटातून त्याने तुफान लोकप्रियता मिळवली आहे. त्याचा भाऊ सनी कौशलनेही बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. लवकरच तो आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचं पोस्टरही प्रदर्शित झालं आहे.
'भांगरा पाले' असे त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे. रॉनी स्क्रुवालाने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आज म्हणजे ३० सप्टेंबरलाच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रुकसार धिल्लोन ही नवोदित अभिनेत्री भूमिका साकारणार आहे. तसंच श्रीया पिळगावंकरचीही यामध्ये भूमिका आहे. स्नेहा तौरानी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
सनी कौशलने त्याच्या अभिनयाची सुरुवात नाटकांपासून केली होती. 'सनशाईन म्यूझिक टूर्स अँड ट्रॅव्हल्स' या चित्रपटातून त्याने चित्रपटात पदार्पण केलं होतं. २०१६ साली त्याने एका शॉर्टफिल्ममध्येही भूमिका साकारली होती. तसंच त्याच्या वेबसीरिजही मोठी लोकप्रियता पाहायला मिळते. त्याच्या 'लव्ह अॅट फर्स्टसाईट' आणि 'ऑफिशिअल चुकीयागीरी' या दोन्हीही वेबसीरिज चाहत्यांच्या पसंतीस उतरल्या.