महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

विकी कौशलच्या एक्स गर्लफ्रेन्डने कवितेद्वारे व्यक्त केले ब्रेकअपचे दु:ख - instagram

हरलिन जरी त्यांच्या ब्रेकअपबाबत माध्यमांसमोर बोलली नसली, तरीही एका कवितेद्वारे तिने सोशल मीडियावर आपले दु:ख व्यक्त केले आहे.

विकी कौशलच्या एक्स गर्लफ्रेन्डने कवितेद्वारे व्यक्त केले ब्रेकअपचे दु:ख

By

Published : Apr 19, 2019, 11:42 AM IST

मुंबई - 'उरी - द सर्जिकल स्ट्राईक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपली वेगळी छाप पाडणारा विकी कौशल काही दिवसांपासून प्रसिद्धीझोतात आहे. त्याच्या आणि हरलिन सेठीच्या ब्रेकअप नंतर तर त्याची जास्तच चर्चा झाली. एका माध्यमाच्या मुलाखतीतही त्याने आता तो सिंगल असल्याचे सांगितले होते. हरलिन जरी त्यांच्या ब्रेकअपबाबत माध्यमांसमोर बोलली नसली, तरीही एका कवितेद्वारे तिने सोशल मीडियावर आपले दु:ख व्यक्त केले आहे.

हरलिनने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करुन कविता लिहिली आहे. या कवितेतुन तिने ब्रेकअपमुळे न हारता पुढे जाणार असल्याचे म्हटले आहे.
'आयुष्यात येणारे चढ उतार मला थांबवु शकत नाहीत. ब्रेकअप मला तोडु शकत नाही. विजयाने मी उत्साही होत नाही, अपयशाने खचुनही जात नाही. माझ्याकडे स्वत:चा आत्मविश्वास आहे', असे तिने या कवितेत लिहिले आहे.

विकी आणि हरलिनचे नाते एका टप्प्यात असताना अचानक दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. विकीने अनेक मुलाखतीत सांगितले होते, की तो एका सिरिअस रिलेशनशीपमध्ये आहे. मात्र, हरलिनने विकीला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर विकीनेही आता तो सिंगल असल्याचे कन्फरमेशन दिले होते. आता हरलिनच्या या कवितेवर त्याची काही प्रतिक्रीया येते का, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details