महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

विकी कौशलचा 'सरदार उधम सिंग' या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, रिलीज डेट जाहीर - shoojit sarkar

दिग्दर्शक सुजित सरकार हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील विकीचा लूक समोर आला होता. लंडन येथे या चित्रपटाचा काही भाग शूट करण्यात आला आहे. तर, पुढील शूटिंग लवकरच पूर्ण होणार असल्याची माहीती सुजित यांनी दिली आहे.

विकी कौशलचा 'सरदार उधम सिंग' या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, रिलीज डेट जाहीर

By

Published : Jun 17, 2019, 7:55 AM IST

मुंबई - सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेण्ड पाहायला मिळतो. राजकिय व्यक्तींपासून ते खेळाडूपर्यंत आत्तापर्यंत बरेचसे बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला आले. या बायोपिकला प्रेक्षकही चांगला प्रतिसाद देतात. आता अभिनेता विकी कौशलही 'सरदार उधम सिंग' या बायोपिकमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

जालियनवाला बाग हत्याकांडाचा सुत्रधार जनरल डायर याची हत्या करणाऱ्या 'सरदार उधम सिंग' यांच्या जीवनावर आधारित हा बायोपिक आहे. विकी कौशल या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, 'उधम सिंग' चित्रपट २ ऑक्टोंबर २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.

दिग्दर्शक सुजित सरकार हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील विकीचा लूक समोर आला होता. लंडन येथे या चित्रपटाचा काही भाग शूट करण्यात आला आहे. तर, पुढील शूटिंग लवकरच पूर्ण होणार असल्याची माहीती सुजित यांनी दिली आहे.

या चित्रपटानंतर सुजित सरकार हे 'गुलाबो सिताबो' या चित्रपटाचेही दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि अमिताभ बच्चन झळकणार आहेत. तर, विकी कौशल हा करण जोहर आणि शशांक खेतानच्या हॉरर 'भूत' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे विकी कौशलच्या दोन वेगवेगळ्या भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details